November 11, 2024 1:56 PM

views 10

भारत आणि रशियानं व्यापारी संबंध आणखी दृढ करण्याची गरज असल्याचं परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर याचं प्रतिपादन

भारत आणि रशियानं व्यापारी संबंध आणखी दृढ करण्याची गरज परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आज व्यक्त केली. मुंबईत भारत - रशिया व्यावसायिक परिषदेला ते संबोधित करत होते. रशियाचे प्रथम उप प्रधानमंत्री डेनिस मान्टुरोव्ह यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते. दोन्ही देशांमधला व्यापार सध्या ६६ अब्ज अमे...

November 11, 2024 1:53 PM

views 70

देशाचे ५१ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी घेतली शपथ

देशाचे ५१ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी आज पदभार स्वीकारला. राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी खन्ना यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. या सोहळ्याला उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अनेक केंद्रीय मंत्री आणि सर्वोच्च न्यायालयाचे ...

November 11, 2024 1:35 PM

views 23

झारखंड विधानसभेच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी आज संध्याकाळी प्रचार थांबणार

झारखंड विधानसभेच्या पहिल्या टप्प्यात १३ नोव्हेंबर रोजी ४३ जागांसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी आज संध्याकाळी प्रचार थांबणार आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दुपारी १२ वाजता पक्ष कार्यकर्त्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि इंडिया आघा...

November 11, 2024 1:32 PM

views 16

भारताच्या अनाहत सिंगनं पटकावलं स्क्वॉश एनएसडब्ल्यू ओपन २०२४ स्पर्धेचं विजेतेपद

भारताच्या अनाहत सिंगनं सिडनी इथं सुरू असलेल्या स्क्वॉश एनएसडब्ल्यू ओपन २०२४ स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद पटकावलं आहे. तीचं हे वर्षातील सातवं पीएसए चॅलेंजर विजेतेपद आहे. अंतिम फेरीत सिंगनं हाँगकाँगच्या १५ वर्षीय हेलन तांगचा ३-१ असा पराभव केला.

November 11, 2024 11:16 AM

views 25

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वच उमेदवारांचा जनसंवादावर भर

काल सुटीच्या दिवशी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी पदयात्रा, जनसंवाद आणि सभा घेण्यावर भर दिल्याचं दिसून आलं. औरंगाबाद पूर्व मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अतुल सावे यांनी काल पदयात्रा काढली. याच मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार लहु शेवाळे यांच्या प्रचारार्थ काँग्रेस...

November 11, 2024 11:21 AM

views 17

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आजपासून चित्ररथाद्वारे मतदार जनजागृती मोहिम

छत्रपती संभाजीनगर इथं आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी शासकीय सेवेतल्या एका अधिकाऱ्यावर प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्याचे आदेश देण्यात आले असून, दुसऱ्या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यास ताकीद दिली आहे. यासंदर्भात खुलताबादच्या कोहीनूर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर अंभोरे आणि सा...

November 11, 2024 11:07 AM

views 25

हिंगोली जिल्ह्यात गृह मतदानाला सुरुवात, पहिल्या दिवशी ७०० ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांचं मतदान

हिंगोली जिल्ह्यात गृह मतदानाला सुरुवात झाली असून, काल पहिल्या दिवशी ७०० ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांनी मतदान केलं. गृह मतदानासाठी जिल्ह्यातून एक हजार ७० जणांनी नोंदणी केली आहे. सेनगाव तालुक्यातल्या हुळी इथं १०२ वर्षे वयाच्या आजोबांनी, तसंच ८७ वर्षीय पारूबाई पोले यांनी मतदानाचा हक्क बजावला.  

November 11, 2024 11:02 AM

views 31

दिल्ली-एनसीआरमधील हवेची गुणवत्ता अजूनही निकृष्ट श्रेणीतच

दिल्ली-एनसीआरमधील हवेची गुणवत्ता अजूनही अत्यंत निकृष्ट या श्रेणीत आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानुसार, दिल्लीत काल रात्री 8 वाजता हवेचा गुणवत्ता निर्देशांक, 336 AQI इतका नोंदवला गेला. येत्या दोन ते तीन दिवसांत दिल्ली एनसीआरमध्ये रात्री आणि सकाळच्या वेळी धुकं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर...

November 11, 2024 11:44 AM

views 33

जम्मू आणि काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एका जवानाला वीरमरण, तीन जखमी

जम्मू आणि काश्मीरमध्ये, किश्तवाड जिल्ह्यातील दुर्गम जंगल भागात दहशतवाद्यांशी काल झालेल्या चकमकीत लष्कराच्या विशेष दलाचा कनिष्ठ अधिकाऱ्यानं प्राणाची आहुती दिली. तर या चकमकीत तीन जवानही गंभीर जखमी झाले. दोन ग्राम संरक्षण रक्षकांची हत्या झाल्यानंतर गुप्तचर माहितीच्या आधारे किश्तवाडमधील भरत रिजच्या भागा...

November 11, 2024 10:51 AM

views 10

रशिया आणि युक्रेनचे परस्परांवर विक्रमी संख्येने ड्रोन हल्ले

रशिया आणि युक्रेननं काल एका रात्रीत परस्परांवर विक्रमी संख्येने ड्रोन हल्ले केले. रशियानं काल रात्री एकंदर 145 ड्रोन हल्ले केले, तर युक्रेननं देखील मॉस्कोच्या दिशेनं 34 ड्रोन हल्ले केले. 2022 मध्ये युद्ध सुरू झाल्यापासून रशियाच्या राजधानीवर झालेला हा सर्वात मोठा ड्रोन हल्ला आहे, यामुळे शहरातील तीन प...