January 5, 2025 2:01 PM

views 15

टेनिसपटू सुमीत नागल एएसबी टेनिस स्पर्धेच्या मुख्य फेरीत दाखल

भारतीय टेनिसपटू सुमित नागलने न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या एएसबी क्लासिक टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या मुख्य सामन्यात प्रवेश केला आहे. त्याने आज सकाळी पात्रता फेरीच्या अंतिम सामन्यात फ्रान्सच्या एड्रियन मॅनारिनोचा पराभव केला. या स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत उद्या, भारताचा युक...

January 5, 2025 11:04 AM

views 13

नांदेड शहरातल्या स्फोट प्रकरणातले सर्व १२ आरोपींची निर्दोष मुक्तता

नांदेड शहरातल्या बहुचर्चित स्फोट प्रकरणात न्यायालयाने सर्व १२ आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. नांदेड शहरात पाटबंधारे नगरातल्या एका घरात सहा एप्रिल २००६ रोजी झालेल्या या स्फोट प्रकरणात काल तब्बल १८ वर्षांनंतर न्यायालयानं निकाल सुनावला. या प्रकरणातल्या १२ आरोपींपैकी दोन आरोपींचा स्फोटातच मृत्यू झाल...

January 5, 2025 10:26 AM

views 30

पुण्यात आयोजित ‘Know Your Army’ मेळाव्यामध्ये सैन्य विषयक माहिती देणारं दालन

लष्कर दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील पुण्यात आयोजित Know Your Army मेळाव्यामध्ये केंद्रीय संचार ब्यूरोचं, सैन्य विषयक माहिती देणारं एक दालन उभारण्यात आलं आहे. या बहुमाध्यम प्रदर्शनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी भेट दिली. भारतीय लष्कराशी संबंधित छायाचित्र आणि माहिती देणारं हे ...

January 5, 2025 12:59 PM

views 43

फ्रेंच नौदलाची अणुऊर्जेवर चालणारी विमानवाहू नौका ‘चार्ल्स डी गॉल’ गोव्यात दाखल

भारत  आणि फ्रान्स  यांच्यातील  वरुण  या संयुक्त नौदल सरावात सहभागी होण्यासाठी  फ्रेंच नौदलाची अणुऊर्जेवर चालणारी विमानवाहू नौका चार्ल्स डी गॉल काल गोव्यात दाखल झाली. गोव्याच्या मुरगाव पोर्ट ट्रस्ट जेट्टीवर  काल या विमानवाहू नौकेचं  आगमन झाल्यावर भारतीय नौदलाच्या वाद्यपथकानं औपचारिक स्वागत केलं. उभय ...

January 5, 2025 7:32 PM

views 31

बॉर्डर-गावस्कर कसोटी क्रिकेट मालिका ऑस्ट्रेलियानं ३-१ अशी जिंकली

बॉर्डर-गावस्कर कसोटी क्रिकेट मालिका ऑस्ट्रेलियानं ३-१ अशी जिंकली आहे. सिडनी इथं झालेल्या पाचव्या सामन्यात आजच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघानं दिलेलं १६२ धावांचं लक्ष्य ऑस्ट्रेलिया संघानं ४ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं.   आज तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर भारतीय संघ केवळ १५७ धावां...

January 5, 2025 9:35 AM

views 26

दिल्लीत दाट धुक्यामुळे विमान आणि रेल्वेसेवा विस्कळीत

धुक्याच्या दाट थरामुळे आज सकाळी दिल्लीत विमान उड्डाण आणि रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. धुक्यामुळे दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अनेक विमानांना उशीर होत आहे. अनेक रेल्वेगाड्या उशिराने धावत आहेत.

January 5, 2025 9:31 AM

views 28

बॉर्डर-गावसकर चषक : क्रिकेट मालिकेतील पाचव्या सामन्यात भारताचं ऑस्ट्रेलियाला १६२ धावांचं आव्हान

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या बॉर्डर-गावसकर कसोटी क्रिकेट मालिकेतील पाचव्या आणि अंतिम सामन्यात भारताचा दुसरा डाव 157 धावांवर संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियापुढे जिंकण्यासाठी 162 धावांचे आव्हान ठेवण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलियाकडून स्कॉट बोलँड याने सर्वाधिक 6 बळी घेतले. भारताने कालच्या 6 बाद 129...

January 5, 2025 9:28 AM

views 13

बिहारमध्ये गुरु गोविंद सिंगजी यांच्या ३५८व्या जयंतीनिमित्त तीन दिवसीय प्रकाश उत्सव

बिहारमधील पाटणा शहरातील तख्त श्री हरमंदिर साहिब इथं शीख समुदायाचे १०वे आणि शेवटचे शीखगुरू गुरु गोविंद सिंगजी यांच्या ३५८व्या जयंतीनिमित्त तीन दिवसीय प्रकाश उत्सव सोहळ्याला काल सुरुवात झाली. तख्त श्री हरमंदिर साहिब हे गुरु गोविंद सिंगजी यांचं जन्मस्थान आहे. यानिमित्तानं आज भव्य नगर कीर्तन अर्थात मिरव...

January 5, 2025 9:24 AM

views 7

मध्यप्रदेश : केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केली ओंकारेश्वर तरंगत्या सौर प्रकल्पाची पाहणी

देशात सौर ऊर्जा निर्मिती क्षेत्रात ९० गिगावॅट क्षमता असून त्याला चालना देण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील, असं मत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी व्यक्त केलं. त्यांनी काल मध्यप्रदेशमधल्या खंडवा जिल्ह्यातील ओंकारेश्वर तरंगत्या सौर प्रकल्पाची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. ओंकारेश्वर...

January 5, 2025 9:16 AM

views 11

शेतजमिनीसाठी प्रतिएकर १२,००० रुपये देण्याचा तेलंगणा मंत्रिमंडळाचा निर्णय

तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांनी रायथू भरोसा योजनेंतर्गत शेतजमिनीसाठी प्रति एकर १२,००० रुपये देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय जाहीर केला आहे. शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या १०,००० रुपयांच्या मदतीमध्ये ही वाढ करण्यात आली आहे. इंदिरम्मा आत्मीय भरोसा योजना या प्रस्तावित योजनेअंतर्गत भूमिहीन श...