January 5, 2025 6:55 PM

views 32

ADB बँकेमार्फत दहा हेक्टरपर्यंत बांबू लागवडीसाठी अनुदानाची योजना

राष्ट्रीय औष्णिक वीज प्रकल्पात इंधन म्हणून कोळशासोबत बांबू बायोमासचा वापर करण्याचा निर्णय झाला असून शेतकरी उत्पादक कंपन्यांबरोबर त्यासाठी ५० वर्षांचा खरेदी करार करण्यात येईल असं   NTPC चे अध्यक्ष गुरदीप सिंह यांनी सांगितलं. NTPC च्या सोलापूर प्रकल्पात दरवर्षी  ४० लाख टन कोळसा  लागतो. त्यात १०% बांबू...

January 5, 2025 1:55 PM

views 50

जम्मू काश्मीरमधे वाहन अपघातात ४ जमांचा मृत्यू, दोघं बेपत्ता

जम्मू काश्मीरमधे किश्तवाड जिल्ह्यात ग्वार मासू परिसरात एका वाहन अपघातात ४ जमांचा मृत्यू झाला तर दोन जण बेपत्ता झाले आहेत. घाटातल्या रस्त्यावरुन घसरुन हे वाहन खोल दरीतल्या नदीत कोसळलं. किश्तवाड पोलिसांनी मदतकार्य सुरु केलं आहे. किश्तवाडचे खासदार आणि केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी या दुर्घटने...

January 5, 2025 1:47 PM

views 4

क्रीडामंत्री मनसुख मांडवीय ‘संडेज ऑन सायकल’ उपक्रमात सहभागी

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय आज फिट इंडिया मोहिमेंतर्गत गुजरातमधे पोरबंदर इथं आयोजित संडेज ऑन सायकल या उपक्रमात सहभागी झाले होते. त्यांनी पोरबंदर मधल्या उपलेटा परिसरात स्थानिकांसमवेत सायकलवरुन रपेट केली.  संडेज ऑन सायकल हा युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयानं सायकलिंग फेडरेशन...

January 5, 2025 1:39 PM

views 26

कर्ज व्यवहार घोटाळ्याप्रकरणी मुंबई आणि दिल्लीत ईडीचे छापे

सक्तवसुली संचालनालयाच्या मुंबई विभागानं सुमारे ४,९५७ कोटी रुपयांच्या कर्ज व्यवहार घोटाळ्याप्रकरणी मुंबई आणि दिल्ली इथल्या १४ ठिकाणांवर छापे घातले असून त्यामध्ये प्रतिभा इंडस्ट्रीज या कंपनीच्या कार्यालयाचा समावेश आहे. या कारवाईत ५ कोटी ४ लाख  रुपयांची  बँक खाती आणि म्युच्युअल फंड गोठवण्यात आले आहेत त...

January 5, 2025 1:30 PM

views 53

नागरिकांच्या डिजिटल वैयक्तिक तपशीलांची गोपनीयता राखण्यासाठी नियमावली जारी

नागरिकांच्या वैयक्तिक माहितीचं संरक्षण करणं हा डिजिटल वैयक्तिक माहिती संरक्षण कायद्याच्या मसुद्याचा उद्देश आहे. असं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. नागरिकांच्या डिजिटल स्वरुपातल्या वैयक्तिक तपशीलांची गोपनीयता कायम राखण्यासाठी कायद्याची चौकट मजबूत क...

January 5, 2025 1:11 PM

views 27

भारत आणि बांगलादेश ताब्यात असलेल्या एकमेकांच्या मच्छीमारांची सुटका करणार

भारत आणि बांगलादेश आज त्यांच्या ताब्यात असलेल्या एकमेकांच्या  मच्छीमारांची  सुटका करणार आहेत. बांगलादेशच्या ताब्यात असलेले  ९५ भारतीय मच्छीमार मायदेशी परतणार असून, भारत ९० बांगलादेशी मच्छिमारांना सोडणार आहे. याशिवाय काही नौका देखील परत केल्या जाणार आहेत. भारतीय मच्छीमार दोन महिन्यांहून अधिक काळ बांग...

January 5, 2025 2:07 PM

views 32

थाळी फेक स्पर्धेत भारतीय सैन्यदलात कार्यरत बनवीर सिंगला सुवर्णपदक

नेपाळमध्ये झालेल्या दक्षिण आशियाई आंतरराष्ट्रीय युवा अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेल्या बनवीर सिंग यानं थाळी फेक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावलं. बनवीर सिंगनं याआधीही अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पारितोषिकं पटकावली आहेत.

January 5, 2025 12:58 PM

views 22

छत्तीसगढ : सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत ४ माओवादी ठार, एक जवान शहीद

छत्तीसगढमधे सुरक्षा दलांनी राबवलेल्या शोधमोहिमेदरम्यान झालेल्या चकमकीत किमान ४ माओवादी ठार झाले. त्यांचे मृतदेह सुरक्षा दलांनी ताब्यात घेतले असून त्यांच्या जवळून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र आणि दारुगोळा जप्त केला आहे. या चकमकीत एक सुरक्षा जवान शहीद झाला.

January 5, 2025 1:58 PM

views 30

महाकुंभमेळ्यासाठी रेल्वे १३,००० गाड्या सोडणार

उत्तर प्रदेशात प्रगायराज इथं होणार असलेल्या महाकुंभ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविक आणि यात्रेकरुंच्या सोयीसाठी भारतीय रेल्वे १३ हजार गाड्या चालवणार आहे. यात १० हजार नियमित आणि ३ हजार विशेष गाड्यांचा समावेश आहे. कुंभमेळ्या आधी आणि नंतर दोन ते ती अतिरिक्त दिवस असे मिळून ५० दिवस या गाड्या चालवल्या जाती...

January 5, 2025 1:59 PM

views 18

HMP विषाणूजन्य आजाराच्या प्रादुर्भावावर सरकारचं बारकाईनं लक्ष – आरोग्य मंत्रालय

HMP या विषाणूजन्य आजाराचा प्रादुर्भाव चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून वेगानं वाढत असून केंद्र सरकारचं त्यावर बारकाईनं लक्ष असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. आय सी एम आर अर्थात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद येत्या काही दिवसांत देशभरात  एच एम पी  च्या चाचण्या करणाऱ्या प्रयोगशाळांची संख्...