November 19, 2025 1:19 PM

views 42

आंध्रप्रदेशातल्या रामपाचोदावरम इथं आज सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत सहा ते सात नक्षली

आंध्रप्रदेशातल्या रामपाचोदावरम इथं आज सकाळी सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत सहा ते सात नक्षली मारले गेले. यात काही वरिष्ठ नक्षली नेत्यांचा समावेश असल्याचं गुप्तचर विभागाचे अतिरिक्त महासंचालक महेश चंद्र लड्डा यांनी वार्ताहरांना सांगितलं.   एनटीआर, कृष्णा, काकिनाडा, एलुरू या जिल्ह्यांमधून जवळपास ...

November 19, 2025 1:18 PM

views 31

माजी प्रधानमंत्री दिवंगत इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आज देशभरातून आदरांजली

माजी प्रधानमंत्री दिवंगत इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आज देशभरात आदरांजली वाहिली जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इंदिरा गांधी यांना समाजमाध्यमावर आदरांजली वाहिली आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल ग...

November 19, 2025 1:00 PM

views 11

अर्थमंत्र्यांनी घेतली आज सातवी अर्थसंकल्पपूर्व बैठक

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सातवी अर्थसंकल्पपूर्व बैठक घेतली. २०२६-२७ च्या आगामी अर्थसंकल्पाच्या अनुषंगानं त्यांनी बँकिंग, वित्त सेवा आणि विमा क्षेत्रातल्या तज्ञांशी चर्चा केली. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरीही या बैठकीला उपस्थित होते. अर्थमंत्र्यांनी काल स्टार्ट अप परिसंस्था आणि भांड...

November 19, 2025 10:36 AM

views 67

नवी दिल्लीतील 44 वा भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा आजपासून सर्वसामान्य लोकांसाठी उघडणार

नवी दिल्लीतील भारत मंडपम इथं सुरू असलेला 44 वा भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा आजपासून सर्वसामान्य लोकांसाठी उघडणार आहे. 'एक भारत-श्रेष्ठ भारत' अशी यावर्षीच्या मेळ्याची मध्यवर्ती सकंल्पना आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र आणि बिहार ही भागीदार राज्यं आहेत, तर झारखंड केंद्रस्थानी आहे.   या ...

November 19, 2025 10:24 AM

views 31

अल फलाह समूहाचे अध्यक्ष जवाद अहमद सिद्दीकी यांना अटक

सक्तवसुली संचालनालयानं अल फलाह समूहाचे अध्यक्ष जवाद अहमद सिद्दीकी यांना आर्थिक अफरातफर प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अटक केली आहे.   एका वर्तमान प्रकरणाच्या चौकशीत अल फलाह समूहाच्या परिसरात केलेल्या शोध कारवाईदरम्यान गोळा झालेल्या पुराव्यांचे सविस्तर तपास आणि विश्लेषण केल्यानंतर ही अटक करण्यात आली.

November 19, 2025 9:22 AM

views 32

नऊ कोटी शेतकऱ्यांना पीएम-किसान योजनेचा एकविसावा हप्ता आज वितरित होणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज तमिळनाडुतील कोइम्बतूर इथं दक्षिण भारत नैसर्गिक शेती शिखर परिषदेचं उद्घाटन करतील. सेंद्रिय शेतकरी दिवंगत नम्मलवार यांनी राबविलेल्या नैसर्गिक शेती पद्धतींचं प्रदर्शन करण्याचा या शिखर परिषदेचा उद्देश आहे.   प्रधानमंत्री नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांशी यावेळी संवाद स...

November 19, 2025 9:11 AM

views 72

वन्य प्राण्यांचे हल्ले आणि धान पीकात पाणी साचण्यालाही प्रधानमंत्री पीकविमा योजनेचं संरक्षण मिळणार

वन्य प्राण्यांचे हल्ले आणि भाताच्या शेतीत पाणी साठल्यानं होणारं नुकसान आता प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत संरक्षित केलं जाईल. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळं होणारं पीक नुकसान आता स्थानिक जोखीम श्रेणी अंतर्गत पाचवं अतिरिक्त कवच म्हणून ओळखलं जाईल, तर भातशेतीचं पाण्यामुळं होणारं नुकसान स्थानिक आपत्...

November 19, 2025 9:41 AM

views 44

मूकबधीरांच्या ऑलिंपिक्समध्ये 10 मीटर एअर रायफल मिश्र सांघिक स्पर्धेत भारतीय नेमबाजांची दुहेरी कामगिरी

टोकियोमध्ये सुरु असलेल्या 25 व्या डेफलिंपिक म्हणजे मूकबधीरांच्या ऑलिंपिक्समध्ये भारतीय नेमबाजांनी काल 10 मीटर एअर रायफल मिश्र सांघिक स्पर्धेत सुवर्ण आणि कास्यपदक जिंकून दुहेरी कामगिरी केली.   धनुष श्रीकांत आणि महित संधू यांच्या जोडीनं सुवर्णपदकाच्या सामन्यात दक्षिण कोरियाच्या जोडीचा 17-7 असा पर...

November 18, 2025 8:13 PM

views 47

राष्ट्रीय जल पुरस्कारांमधे सर्वोत्कृष्ट राज्य म्हणून महाराष्ट्राचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव

नवी दिल्ली इथं आज झालेल्या सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय जल पुरस्कार २०२४ प्रदान करण्यात आले. यात महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्य विभागात प्रथम पुरस्कारने गौरवण्यात आलं. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला.  राज्य सरकारन...

November 18, 2025 8:08 PM

views 22

राज्याच्या काही भागात गारठा वाढला

राज्याच्या काही भागात गारठा वाढला असून आज धुळ्यात सर्वात कमी, ६ पूर्णांक २ दशांश अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवलं गेलं. नाशिक जिल्ह्यात निफाड इथं ६ पूर्णांक ९, तर  नाशिक शहरात ९ पूर्णांक २ दशांश सेल्सिअस दशांश अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.    उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे भंडारा...