टोकियोमध्ये सुरु असलेल्या 25 व्या डेफलिंपिक म्हणजे मूकबधीरांच्या ऑलिंपिक्समध्ये भारतीय नेमबाजांनी काल 10 मीटर एअर रायफल मिश्र सांघिक स्पर्धेत सुवर्ण आणि कास्यपदक जिंकून दुहेरी कामगिरी केली.
धनुष श्रीकांत आणि महित संधू यांच्या जोडीनं सुवर्णपदकाच्या सामन्यात दक्षिण कोरियाच्या जोडीचा 17-7 असा पराभव केला. तर मोहम्मद वानिया आणि कोमल वाघमारे यांच्या जोडीनं युक्रेनियन जोडीचा 16-12 असा पराभव करून कांस्यपदक जिंकलं.