July 26, 2025 2:24 PM

views 26

चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांची उपांत्य फेरीत धडक

चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे. चीनमधे चांगझाऊ इथं सुरु असलेल्या या स्पर्धेत त्यांनी मलेशियाच्या जोडीचा पराभव केला असून आता त्यांची लढत  मलेशियाच्याच आरॉन चिया आणि सो वूई यिक या जोडीशी होणार  आहे. 

July 26, 2025 2:23 PM

views 18

कंबोडिया आणि थायलंडच्या सीमावर्ती भागात भारतीय नागरिकांनी प्रवास टाळावा

कंबोडिया आणि थायलंडच्या सीमावर्ती भागात सुरु असलेला संघर्ष लक्षात घेता, भारतीय नागरिकांनी या भागात प्रवास टाळावा, अशी सूचना कंबोडियातल्या भारतीय दूतावासानं दिली आहे.THAI दूतावासानं आज जारी केलेल्या निवेदनात हेल्पलाईन क्रमांक आणि ईमेल दिला आहे. भारतीय नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत या ठिकाणी संपर्क ...

July 26, 2025 1:53 PM

views 69

‘न्यू स्टार्ट’ समझोता करारातल्या तरतुदी जपण्याला आपली पसंती -डोनाल्ड ट्रम्प

अण्वस्त्रकपातीसाठी रशियाबरोबर केलेल्या ‘न्यू स्टार्ट’ समझोता करारातल्या तरतुदी जपण्याला आपली पसंती असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं आहे. स्कॉटलंडच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. या कराराच्या  दिशेने काम करायला आपण  सुरुवात करत असल्...

July 26, 2025 1:50 PM

views 18

FIDE Women’s Chess World Cup: कोनेरू हंपी आणि दिव्या देशमुख यांच्यात लढत

फिडे महिला बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम लढत आज भारताच्या दोन ग्रँडमास्टर्स, कोनेरू हंपी आणि दिव्या देशमुख यांच्यात रंगणार आहे. या स्पर्धेचं जेतेपद आणि उपविजेतेपदही भारताकडे येणार आहे. या स्पर्धेत जिंकणारी बुद्धिबळपटू पुढच्या वर्षीच्या फिडे महिला कँडिडेट्स टूर्नामेंटमध्ये जागतिक अजिंक्यपदासाठी ...

July 26, 2025 1:48 PM

views 28

झारखंड: चकमकीत जनता जन मुक्ती पार्टी नक्षलवादी संघटनेचे तीन सदस्य ठार

झारखंडच्या गुमला जिल्ह्यात आज सकाळी पोलिसांशी झालेल्या चकमकीत जनता जन मुक्ती पार्टी या बंदी घातलेल्या नक्षलवादी संघटनेचे तीन सदस्य ठार झाले. या तिघांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले. तसंच या ठिकाणावरून एके-४७ आणि इनसास रायफल्सही जप्त केल्या.

July 26, 2025 1:43 PM

views 22

संसदेत येत्या सोमवारी ऑपरेशन सिंदूरविषयी चर्चा

संसदेत येत्या सोमवारी ऑपरेशन सिंदूरविषयी चर्चा होणार असल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांना काल माध्यमांशी बोलताना दिली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली संसदीय कामकाज समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आल्याचं ते म्हणाले.   संसदेच्या दोन्ही सभागृहात यावर चर्...

July 26, 2025 1:39 PM

views 28

मालदीव्जच्या 60व्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याला प्रधानमंत्री उपस्थित राहणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मालदीव्जचे उपराष्ट्राध्यक्ष हुसैन मोहम्मद लतीफ यांची भेट घेऊन चर्चा केली. परराष्ट्रव्यवहारमंत्री डॉ. एस जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल तसंच परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री त्यांच्यासोबत होते.    प्रधानमंत्र्यांनी मालदीव्जचे माजी प्रधानमंत्री आणि मा...

July 26, 2025 1:32 PM

views 63

तमिळनाडूमधे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन

 मालदीव दौऱ्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी दोन दिवसांच्या तमिळनाडू दौऱ्यासाठी तुतिकोरीन इथं पोहोचतील. तुतिकोरीन विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीचं उद्घाटन ते करतील. तसंच ४ हजार ६०० कोटी रुपयांच्या विविध विकासकामांची पायाभरणी आणि लोकार्पण प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.   अ...

July 26, 2025 1:25 PM

views 11

देशभरात करगील विजय दिवस साजरा

देशभर आज कारगिल विजय दिवस साजरा होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज कारगिल विजय दिनानिमित्त देशासाठी बलिदान देणाऱ्या शूर सैनिकांना आदरांजली वाहिली. हा दिवस देशाच्या सैनिकांचं असाधारण शौर्य, धैर्य आणि दृढनिश्चयाचं  प्रतीक आहे, असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.    प्रधानमंत्री नरेंद्...

July 26, 2025 1:46 PM

views 10

केंद्रसरकारकडून देशभरातल्या १० कोटी १८ लाखापेक्षा जास्त महिलांच्या कर्करोगाची तपासणी

आयुष्मान आरोग्य मंदिर आणि राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत केंद्रसरकारने देशभरातल्या १० कोटी १८ लाखापेक्षा जास्त महिलांची सर्व्हायकल कॅन्सर, म्हणजेच, गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची तपासणी केली आहे. असंसर्गजन्य आजारांची तपासणी, प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठी लोकसंख्या-आधारित उपक्रमाचा हा एक भाग असल्याचं आ...