July 27, 2025 1:29 PM

views 11

अमृतसरमध्ये अमली पदार्थांशी संबंधित पैसा सीमापार तस्करी करणारं जाळं उघडकीस

पंजाब पोलिसांनी आज अमृतसरमध्ये केंद्रीय संस्थांच्या मदतीने केलेल्या कारवाईत अत्याधुनिक शस्त्र आणि ड्रग्ज मनी, अर्थात अमली पदार्थांशी संबंधित पैसा सीमापार तस्करी करणारं जाळं उघडकीला आणलं असून, या प्रकरणी ५ जणांना अटक केली.    आरोपींचा पाकिस्तानमधल्या आयएसआय या दहशतवादी संघटनेशी थेट संबंध असल्याच...

July 27, 2025 1:31 PM

views 6

हरिद्वारच्या मनसादेवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत ६ जणांचा मृत्यू

उत्तराखंडमधे हरिद्वारच्या मनसादेवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत ६ जणांचा मृत्यू झाला. उच्च दाबाची विजेची तार दर्शनासाठी जमलेल्या भाविकांच्या  गर्दीवर कोसळून ही दुर्घटना झाली. उत्तराखंड पोलीस, राज्य राखीव पोलीस दल, आणि इतर यंत्रणांची पथकं बचावकार्य करीत आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी ...

July 27, 2025 1:33 PM

views 23

FIDE Chess World Cup : कोनेरू हंपी आणि दिव्या देशमुख यांच्यात विजेतेपदासाठीची लढत सुरु

फिडे महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत कोनेरु हंपी आणि दिव्या देशमुख या तुल्यबळ  खेळाडूंमधे विजेतेपदासाठीची लढत सुरु आहे. पहिला गेम काल बरोबरीत राहिल्यानं दोघींनाही प्रत्येकी अर्धा गुण देण्यात आला आहे.  दुसरा निर्णायक गेम आज होणार आहे.

July 27, 2025 9:58 AM

views 34

प्रधानमंत्री आज ‘मन की बात’ या कार्यक्रमातून संवाद साधणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी ११ वाजता आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधतील. हा या कार्यक्रमाचा १२४ वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व प्रसारण सेवा, युट्यूब वाहिन्या, संकेतस्थळ तसंच न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवरून या कार्यक्रमाचं थेट प्र...

July 26, 2025 8:43 PM

views 102

सरन्यायाधीशपदावरुन निवृत्त झाल्यावर कोणतंही शासकीय पद स्वीकारणार नाही-भूषण गवई

सरन्यायाधीशपदावरुन निवृत्त झाल्यावर आपण कायदेविषयक सल्ला- मार्गदर्शन आणि लवाद या पर्यायी तंटा निवारण व्यवस्थेसाठी काम करणार असून कोणतंही शासकीय पद स्वीकारणार नाही, असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी सांगितलं आहे. अमरावती जिल्हा आणि सत्र न्यायालयात टी. आर. गिल्डा स्मृती ई-लायब्ररी'चं उद्घाटन ...

July 26, 2025 8:36 PM

views 19

देशभर कारगिल विजय दिनानिमित्त विविध कार्यक्रमातून कारगिल हुतात्म्यांना अभिवादन

देशभर आज कारगिल विजय दिवस साजरा होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज कारगिल विजय दिनानिमित्त देशासाठी बलिदान देणाऱ्या शूर सैनिकांना आदरांजली वाहिली.    देशाच्या आत्मसन्मानाचं रक्षण करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या भारत मातेच्या वीर सुपुत्रांचं आपण स्मरण करतो असं प्रधानमंत्री नर...

July 26, 2025 8:34 PM

views 26

महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम, धरणाच्या पाणी पातळीत वाढ

महाराष्ट्रात बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढला असून विविध धरणांमधल्या पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ होत आहे. मुंबई आणि उपनगरांत आज सकाळपासून पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळत होत्या. रायगड जिल्ह्यात ताम्हिणी घाट आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसामुळे सावित्री नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. गोंदिया जि...

July 26, 2025 8:21 PM

views 8

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते तमिळनाडूत विविध विकासकामांची पायाभरणी आणि लोकार्पण

मालदीवचा दोन दिवसांचा यशस्वी दौरा संपवून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मायदेशी परतले. प्रधानमंत्री आज संध्याकाळी दोन दिवसांच्या तमिळनाडू दौऱ्यासाठी तुतिकोरीन इथं पोहोचले. ४ हजार ६०० कोटी रुपयांच्या विविध विकासकामांची पायाभरणी आणि लोकार्पण प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.    मालदीवच्या ६० व्य...

July 26, 2025 8:40 PM

views 17

FIDE Chess World Cup: कोनेरू हंपी आणि दिव्या देशमुख यांच्यात पहिला टप्पा ड्रॉ

फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कोनेरू हंपी आणि दिव्या देशमुख यांच्यात पहिला टप्पा ड्रॉ झाला आहे. या स्पर्धेचं जेतेपद आणि उपविजेतेपदही भारताकडे येणार आहे. त्यामुळे भारताच्या महिला बुद्धिबळाच्या वाटचालीतला हा एक ऐतिहासिक टप्पा  ठरला आहे.    या स्पर्धेत जिंकणारी बुद्धिबळपट...

July 26, 2025 2:26 PM

views 30

नाहिद-२ चं रशियाच्या सोयुझ अग्निबाणाद्वारे यशस्वीरित्या प्रक्षेपण

इराणने काल दूरसंचार आणि संशोधन उपग्रह नाहिद-२ चं रशियाच्या सोयुझ अग्निबाणाद्वारे यशस्वीरित्या प्रक्षेपण केलं. हा उपग्रह मल्टी पेलोड मोहिमेचा भाग असून यामध्ये रशियाच्या युनिस्फीअर-एम ३ आणि एम ४ उपग्रह, तसंच विविध देशांचे १८ इतर उपग्रह समाविष्ट होते.