July 28, 2025 7:04 PM

views 28

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ

हिंगोली जिल्ह्यातल्या आखाडा बाळापूर इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे.  नामांकन भरण्याच्या पहिल्याच दिवशी ७ जणांनी अर्ज दाखल केले आहेत.  ३० ऑगस्ट रोजी मतदान होणार असून ३१ ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे .

July 28, 2025 6:58 PM

views 40

राज्यात संपूर्ण आठवडाभर पावसाची शक्यता – हवामान विभाग

नाशिकमध्ये घाट परिसरांत गेल्या दोन दिवसांत पावसाचा जोर वाढल्यानं गंगापूर धरण ७३ टक्क्यांपेक्षा जास्त भरलं आहे. आज सकाळी ११ वाजता गंगापूर धरणातून ६०३ क्युसेकचा विसर्ग गोदावरीत सोडण्यात आला. जिल्ह्यात इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, दिंडोरी, कळवण, बागलाण या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. ...

July 28, 2025 6:53 PM

views 14

राज्य सरकार अ‍ॅप आधारित रिक्षा, टॅक्सी आणि ई बाईक सेवा सुरू करणार

राज्यात अ‍ॅप आधारित रिक्षा, टॅक्सी आणि ई बाईक सेवा राज्य सरकार सुरू करणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज सांगितलं. या अ‍ॅपला जय महाराष्ट्र, महा राईड, महा यात्री किंवा महा गो यापैकी एक नाव दिलं जाईल, असं ते म्हणाले.   मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मान्यता दिल्यानंतर हे...

July 28, 2025 6:48 PM

views 38

ऑपरेशन सिंदूर स्थगित केलेलं आहे, संपलेलं नाही – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

ऑपरेशन सिंदूर स्थगित केलेलं आहे, संपलेलं नाही. पाकिस्तानने भविष्यात कोणतीही आगळीक केली, तर ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरू होईल, असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज लोकसभेत सांगितलं. ऑपरेशन सिंदूरवरच्या चर्चेच्या प्रारंभी ते बोलत होते.    (या कारवाईत भारताच्या सेनादलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त क...

July 28, 2025 6:39 PM

views 9

राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षांनी विविध मुद्द्यांवर गदारोळ केल्यामुळे राज्यसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे आधी दुपारी बारा आणि नंतर दोन वाजेपर्यंत कामकाज  तहकूब झालं. नंतरही गदारोळ च...

July 28, 2025 3:23 PM

views 29

मुंबई विद्यापीठाचा २०२६-२७ वर्षासाठीचा बृहत आराखडा अधिसभेत मंजूर

मुंबई विद्यापीठाचा २०२६-२७ वर्षासाठीचा बृहत आराखडा काल अधिसभेत मंजूर करण्यात आला. या आराखड्यात १५ नवीन बहुविद्याशाखीय कौशल्याधारीत महाविद्यालयं आणि २ पारंपरिक उपयोजित महाविद्यालयं अशी एकूण १७ महाविद्यालयं प्रस्तावित करण्यात आली आहेत.   त्याखेरीज मुंबई विद्यापीठाचे विविध विभाग, केंद्रं, शाळा आणि...

July 28, 2025 3:21 PM

views 21

श्रावण सोमवार निमित्त राज्यातल्या शिवमंदिरांमधे दर्शनासाठी गर्दी

आज पहिला श्रावण सोमवार. बारा ज्योतिर्लिंगांमध्ये समावेश असलेल्या राज्यातल्या शिवमंदिरांमध्ये तसंच इतर प्रसिद्ध शिवमंदिरांमधे आज पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. मुंबईच्या बाबुलनाथ मंदिरात सकाळपासून दर्शनासाठी गर्दी झाली होती.    छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या घृष्णेश्वर, आणि इत...

July 28, 2025 3:18 PM

views 20

BSNL ला २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या तिमाहीत २६० तर चौथ्या तिमाहीत २८० कोटी रुपयांचा नफा

बीएसएनएल अर्थात भारत संचार निगम लिमिटेडला,२०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत २६०, तर चौथ्या तिमाहीत २८० कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज वार्ताहरांना ही माहिती दिली. बीएसएनएलच्या सहकार्यानं दूरसंचार विभागानं आयोजित केलेल्या दोनपैकी पहि...

July 28, 2025 3:11 PM

views 56

Supreme Court : न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या याचिकेवर सुनावणी

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी अंतर्गत चौकशी समितीच्या अहवालाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली.   या चौकशी प्रक्रियेत सहभागी झाल्यानंतर यावर तुम्ही प्रश्नचिन्ह कसं उपस्थित करू शकता? असा प्रश्न न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती ए....

July 28, 2025 2:36 PM

views 10

गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

गुजरातच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडल्यामुळे खेडा आणि अहमदाबाद सह अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गांधीनगर इथल्या राज्य आपत्कालीन नियंत्रण केंद्रात बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. राज्यात आज सर्वत्र पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.