August 1, 2025 12:39 PM

views 14

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या २०व्या हप्त्याचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते वितरण

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या विसाव्या हप्त्याचं वितरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या होणार आहे. प्रधानमंत्री उद्या उत्तर प्रदेशात वाराणसीच्या दौऱ्यावर असतील. यावेळी प्रधानमंत्री किसान सन्मान योजने अंतर्गत नऊ कोटी 70 लाख शेतकऱ्यांना 20 हजार 500 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम वितरि...

August 1, 2025 1:24 PM

views 54

बँकिंग कायदा सुधारणा अधिनियम 2025 आजपासून लागू

बँकिंग क्षेत्रात प्रशासकीय सुधारणांसाठी तसंच ठेवीदार आणि गुंतवणूकदारांना अधिकाधिक संरक्षण देण्याच्या उद्देशानं बँकिंग कायदा सुधारणा अधिनियम २०२५ आजपासून लागू होत आहे. हा कायदा यावर्षी १५ एप्रिलला अधिसूचित करण्यात आला होता. सार्वजनिक क्षेत्रांतल्या बँकांमध्ये लेखापरीक्षणाची गुणवत्ता वाढवणं आणि सहकारी...

August 1, 2025 9:57 AM

views 33

निवडणूक आयोग बिहारमध्ये तयार केलेली प्रारूप मतदार यादी प्रकाशित करणार

बिहारमध्ये मतदार यादी पुनरीक्षण मोहिमे अंतर्गत तयार केलेली प्रारूप मतदार यादी आज निवडणूक आयोग प्रकाशित करणार आहेत. बिहारमधील सर्व 38 जिल्ह्यांमधील सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना मतदार यादीची प्रत्यक्ष आणि डिजीटल प्रत देण्यात येईल असं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितलं. बिहारचे मु...

July 31, 2025 8:01 PM

views 27

नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख म्हणून वाईस ऍडमिरल क्रिष्णा स्वामीनाथन यांनी पदभार स्वीकारला

नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख म्हणून वाईस ऍडमिरल क्रिष्णा स्वामीनाथन यांनी आज पदभार स्वीकारला. वाईस ऍडमिरल संजय सिंग चार दशकांच्या सेवेनंतर निवृत्त झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर स्वामिनाथन रुजू होणार आहेत. पदभार स्वीकारताच स्वामीनाथन यांनी मुंबईमधल्या नेवल डॉकयार्ड इथल्या गौरव स्तंभावर देशासाठ...

July 31, 2025 8:02 PM

views 25

अमेरिकेनं भारतावर लादलेल्या २५% आयात शुल्काबाबत मंत्री पीयूष गोयल यांचं निवेदन

अमेरिकेनं भारतावर लादलेल्या  २५ टक्के आयात शुल्काबाबत वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी संसदेत निवेदन केलं. अमेरिकेनं भारताच्या निर्यातीवर केलेल्या शुल्कवाढीच्या परिणामांची तपासणी सरकार करत असून देशाचं हित जपण्यासाठी आवश्यक पावलं उचलली जातील, असं त्यांनी सांगितलं. याविषयी शेतकरी, उद्योजक, सूक्ष्म, लघु...

July 31, 2025 7:30 PM

views 39

गणेशोत्सवासाठी ६ अतिरिक्त विशेष रेल्वे गाड्या धावणार !

गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव दरम्यान ६ अतिरिक्त विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत. आधी जाहीर करण्यात आलेल्या २९६ गणपती विशेष रेल्वे गाड्यांव्यतिरिक्त या ६ गाड्या चालवण्यात येणार असून यामुळे आता गणपती विशेष रेल्वेगाड्यांची एकूण संख्या ३०२ झाली आहे. या गाड्यांसा...

July 31, 2025 7:20 PM

views 21

विधानसभा निवडणुकीत VVPAT आणि मतदान यंत्रातल्या मतांमध्ये तफावत आढळली नसल्याचा निर्वाळा

गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये छेडछाड झाल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार संबंधित मतदार संघांमधल्या मतदान यंत्रांच्या चाचण्या राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी पूर्ण केल्या. त्यात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र छेडछाडीपासून सुरक...

July 31, 2025 7:13 PM

views 25

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालावर संमिश्र प्रतिक्रीया…

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालावर मालेगावात संमिश्र प्रतिक्रीया उमटल्या. हिंदुत्ववादी संघटनांनी निकालाचं स्वागत करत जल्लोष केला. शहराच्या पूर्व भागात या निकालाचा निषेध करण्यात आला. मालेगाव बॉम्बस्फोटात मरण पावलेल्यांच्या कुटुंबांनी निर्णयामुळे निराश झाल्याचं सांगितलं. या निकालाविरोधात उच्च न्य...

July 31, 2025 7:08 PM

views 32

२००८ मधल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी ७ आरोपींची निर्दोष मुक्तता

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व सात आरोपींची आज विशेष एनआयए न्यायालयाने ठोस पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली. सुमारे १७ वर्षे चाललेल्या या प्रदीर्घ खटल्यानंतर न्यायालयाने हा आदेश दिला.   आरोपींमध्ये माजी खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय या...

July 31, 2025 7:15 PM

views 46

Cabinet Decision : छत्रपती संभाजीनगर ते परभणी रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाला मंजुरी

केंद्रीय मंत्रिमंडळानं छत्रपती संभाजीनगर ते परभणी दरम्यान रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाला मंजुरी दिली आहे. त्यासाठी सुमारे २ हजार २०० कोटी रुपये खर्च येणार आहे. याशिवाय इटारसी - नागपूर दरम्यान सुमारे साडे ५ हजार कोटी रुपये खर्च करुन चौथा रेल्वे मार्ग टाकला जाणार आहे. माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्...