August 3, 2025 10:03 AM

views 38

खासगी बाजार समित्यांना दिलेल्या वन टाईम परवान्यांबाबत पुनर्विचार,’एक तालुका, एक बाजार समिती’चं नियोजन

राज्यातल्या खासगी बाजार समित्यांना दिलेल्या वन टाईम परवान्यांबाबत पुनर्विचार सुरु असून, केवळ शेतकऱ्यांना मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करणाऱ्या खासगी बाजार समित्यांच्या परवान्यांचं नूतनीकरण केलं जाईल, असं पणन मंत्री जयकुमार रावल यांनी म्हटलं आहे. ते काल नंदुरबार इथं बोलत होते. आगामी काळात 'एक तालुका एक ...

August 2, 2025 8:36 PM

views 10

जम्मू काश्मीरमधे सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार

जम्मू काश्मीरमधल्या कुलगाम जिल्ह्यातल्या अखल देवसर भागात आज सकाळी सुरक्षा दलांसोबत सुरू असलेल्या  चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. या भागात दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाल्यानंतर काल संध्याकाळी शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. लष्कर, जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफने संयुक्तपणे ही मोहीम र...

August 2, 2025 8:34 PM

views 24

भारतावर २५ टक्के आयातशुल्क लागू करण्यासंदर्भात मंत्री गोयल यांची उद्योजकांशी चर्चा

भारतावर २५ टक्के आयातशुल्क लागू करण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर  केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल  यांनी आज मुंबईत काही प्रमुख उद्योजकांशी चर्चा केली. जागतिक स्पर्धा, स्थैर्य, नवोन्मेष आणि मूल्य साखळीला चालना देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर या बैठकीत विचारविनिमय करण्यात ...

August 2, 2025 8:33 PM

views 9

हॉंगकाँग वेधशाळेचा दुसऱ्यांदा कृष्ण वादळाचा इशारा जारी

हॉंगकाँग वेधशाळेनं आज आठवड्यात दुसऱ्यांदा कृष्ण वादळाचा इशारा जारी केला आहे. या वादळामुळे जोरदार वारे वाहण्याची तसंच ताशी ७० मिलीमीटरहून जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्व् भूमीवर हॉंगकाँगच्या गृह व्यवहार  मंत्रालयानं आपत्कालीन समन्वय केंद्र कार्यान्वित केलं आहे. या वादळामुळे सार्वजनिक सेवा ...

August 2, 2025 8:29 PM

views 28

युपीआयचा गेल्या महिन्यात १ हजार ९४७ कोटी व्यवहारांसह नवीन विक्रम

देशाच्या डिजिटल पेमेंटचा आधार असलेल्या युपीआय, म्हणजेच  युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसनं  जुलै २०२५ मध्ये १ हजार ९४७ कोटी व्यवहारांसह एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. या व्यवहारांची एकूण रक्कम तब्बल २५ लाख १० हजार कोटी रुपये इतकी आहे. ही  आकडेवारी युपीआय द्वारे केलेल्या व्यवहारांमध्ये वर्षाला ३५ टक्के...

August 2, 2025 8:28 PM

views 25

विश्वचषक बुद्धिबळ विजेती दिव्या देशमुखचा सत्कार

ग्रँडमास्टर दिव्या देशमुखनं बुद्धिबळ या खेळातलं चीनचं वर्चस्व मोडीत काढलं याबद्दल एक भारतीय म्हणून तिचा अभिमान वाटत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. फिडे महिला विश्वचषक बुद्धिबळ विजेती दिव्या देशमुख हिचा आज नागपूर इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सत्कार झाला त्यावेळी ...

August 2, 2025 8:27 PM

views 3

भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवल्याचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा भारताने नाकारला

भारतानं रशियाकडून तेल खरेदी थांबवल्याचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा भारतानं आज नाकारला आहे. भारतानं रशियाकडून तेल खरेदी थांबवली नाही असं भारतानं स्पष्ट केलं. राष्ट्रीय हित आणि बाजार याला अनुसरून भारत इंधन खरेदी करत असतो, भारतीय तेल कंपन्यांनी रशियाकडून तेल खरेदी थांबवल्याची मा...

August 2, 2025 8:22 PM

views 5

केरळच्या दोन नन्सना जामीन मंजूर

छत्तीसगडच्या बिलासपूर इथल्या  एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेच्या  न्यायालयानं  केरळच्या दोन नन्सना आज जामीन मंजूर केला. मानवी तस्करी आणि जबरदस्तीने धर्मांतर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. गेल्या आठवड्यात छत्तीसगडच्या नारायणपूर इथं पोलिसांनी या दोन नन्सना  आणि एका व्यक्तीला अटक केली होती.

August 2, 2025 8:20 PM

views 23

पाल अभयारण्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जंगल सफारीचं उद्घाटन

सातपुडा पर्वतरांगेच्या कुशीत वसलेल्या जळगाव जिल्ह्यातल्या पाल अभयारण्यात आज जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जंगल सफारीचं उद्घाटन झालं.  सातपुडा जंगल सफारी हा ग्रामीण विकास आणि पर्यावरण संवर्धनाचा अभिनव संकल्प असून जैवविविधतेचं संवर्धन, स्थानिक रोजगार आणि पर्यावरण पर्यटनासाठी जंगल सफा...

August 2, 2025 8:14 PM

views 8

भारताला सी-२९५ लष्करी वाहतूक विमानांमधली शेवटची १६ विमानं प्राप्त

भारताला सी-२९५ लष्करी वाहतूक विमानांमधली शेवटची १६ विमानं प्राप्त झाली असून त्यामुळे भारताची संरक्षण क्षमता आणखी मजबूत झाली आहे. स्पेनमध्ये सेव्हील इथं भारताचे राजदूत दिनेश पटनाईक आणि भारतीय हवाईदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे हस्तांतरण झालं. नियमित वेळापत्रकाच्या दोन महिने आधी विमानं प्र...