August 3, 2025 3:24 PM

views 15

कबुतरखाना हटवण्याविरोधात जैन समाजाची शांतीदूत यात्रा

मुंबईतले कबुतरखाने हटवण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महापालिकेनं सुरु केलेल्या कारवाई विरोधात जैन समाजानं आज शांतीदूत यात्रा काढली. या कारवाईमुळे आपल्या धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याचं जैन समाजानं म्हटलं आहे. तर बिल्डर लॉबीचा दबावामुळे कबुतरखाना हटवला जात असल्याचा दावाही अनेकांकड...

August 3, 2025 3:21 PM

views 28

पुणे जिल्ह्यात हिंसाचाराप्रकरणी आतापर्यंत १५ जणांना अटक

पुणे जिल्ह्यात यवत इथे झालेल्या हिंसाचाराप्रकरणी आतापर्यंत १५ जणांना अटक झाली असून ५००हून अधिक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या १५ आरोपींना ६ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात येणार आहे.   हिंसाचाराला कारणीभूत ठरलेली वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या तरुणालाही अटक करण्यात आली आहे. य...

August 3, 2025 6:49 PM

views 26

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात अभिवादन

स्वातंत्र्यसंग्रामातले थोर सेनानी, प्रतिसरकारचे प्रणेते, क्रांतिसिंह कॉम्रेड नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर इथल्या शासकीय निवासस्थानी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून...

August 3, 2025 2:24 PM

views 65

अभिनेते माधवन बॉब यांचं चेन्नईमध्ये निधन

तामिळ चित्रपटसृष्टीतले विनोदी अभिनेते माधवन बॉब यांचं काल संध्याकाळी चेन्नईमध्ये निधन झालं. ते ७१ वर्षांचे होते. त्यांनी कमल हसन, रजनीकांत, अजित, सूर्या आणि विजय यांच्यासोबत काम केलं आहे.   सुमारे ६०० चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. त्यात तमिळ प्रमाणेच हिंदी, तेलुगु आणि मल्याळम या भाषांमधल्या ...

August 3, 2025 2:21 PM

views 34

पोर्तुगालमध्ये उष्णतेची लाट,तापमान ४४ अंशांवर पोहोचण्याची शक्यता

पोर्तुगालमधे आज उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी करण्यात आला आहे. उष्णतेच्या लाटेसोबतच जंगलातल्या वणव्यांमुळे तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत उष्णता आणि वणव्यांची तीव्रता वाढण्याची शक्यता असल्याचं पोर्तुगालच्या गृहमंत्री मारिया लुसिया यांनी सांगितलं.   उत्तर आ...

August 3, 2025 2:19 PM

views 22

जागतिक टेबल टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मानूष शाह आणि दिया चितळे यांची लढत

ब्राझीलमध्ये फोज दो इगुआचू इथं सुरु असलेल्या जागतिक टेबल टेनिस स्टार स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज भारताच्या मानूष शाह आणि दिया चितळे यांची लढत जपानच्या सातोशी इडा आणि होनोका हाशिमोटो यांच्याशी होणार आहे.   भारतीय प्रमाणवेळेनुसार आज रात्री ९ वाजता हा सामना सुरु होईल. पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरी...

August 3, 2025 2:15 PM

views 14

१७ वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धात लैकीला रौप्यपदक

ग्रीसमध्ये सुरु असलेल्या, १७ वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत, भारतीय कुस्तीगीर लैकी यानं पुरुषांच्या ११० किलो फ्रीस्टाइलमध्ये रौप्यपदक जिंकलं. दरम्यान, आणखी एक भारतीय कुस्तीगीर सिटेंडरनं पुरुषांच्या ६० किलो फ्रीस्टाइलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. सिटेंडरनं उपांत्य फेरीत कझाकस्तानच्या बेकासिल ...

August 3, 2025 2:11 PM

views 170

महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार ५ ऑगस्ट रोजी मुंबईत प्रदान करण्यात येणार

महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार येत्या मंगळवारी ५ ऑगस्ट रोजी मुंबईत प्रदान करण्यात येणार आहेत. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार गझलगायक भीमराव पांचाळे यांना प्रदान करण्यात येणार आहे. तसंच, चित्रपती व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार अभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना प्रदान करण्यात येईल. &n...

August 3, 2025 2:07 PM

views 24

मणिपूरमध्ये अतिरेकी संघटनांशी संबंधित पाच जणांना अटक, मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त

मणिपूरमध्ये सुरक्षा दलांनी गेल्या २४ तासांत अतिरेकी संघटनांशी संबंधित आणि अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या पाच जणांना अटक केली आहे. या कारवाईत कांगलेइपाक कम्युनिस्ट पार्टी या अतिरेकी संघटनेचा म्होरक्या अमरजित सिंह उर्फ नोनो याला अटक करण्यात आली आहे. सिंह याच्यावर महिलांवर अत्याचार करणं, खंडणी, अपहरण...

August 3, 2025 12:46 PM

views 23

उप-हिमालयीन पश्चिम बंगालमध्ये तीव्र मुसळधार पावसाचा अंदाज हवामान

अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, सिक्कीम आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगालमध्ये तीव्र मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. बिहार, पूर्व उत्तर प्रदेश, केरळ, माहे, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल आणि उत्तराखंडमध्ये दिवसभर मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज असून ; मध्य प्रदेश, राजस...