August 3, 2025 7:56 PM

views 18

Uttar Pradesh : गोंडा इथं झालेल्या अपघातात ११ जणांचा मृत्यू, ४ जखमी

उत्तर प्रदेशात गोंडा इथं आज सकाळी झालेल्या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले आहेत. पृथ्वीनाथ मंदिरात जाणाऱ्या १५ भाविकांनी भरलेल्या एक बोलेरो गाडीवरचं नियंत्रण सुटून ती रेहरा गावातल्या सरयू कालव्यात पडली. या कालव्यातून ४ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे.   प्रधानमंत्री नरेंद...

August 3, 2025 7:56 PM

views 20

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाची शोध मोहीम सुरुच

जम्मू काश्मीरमधल्या कुलगाम जिल्ह्यात आज सलग तिसऱ्या दिवशीही सुरक्षा दलाची शोध मोहीम सुरु आहे. यादरम्यान दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत आज आणखी एक दहशतवादी ठार झाला. आतापर्यंत या चकमकीत एकूण तीन दहशतवादी ठार झाले आहेत. शुक्रवारी रात्री ८ वाजता देवसरमधे अखलच्या जंगलात चार ते पाच दहशतवादी लपल्याची मा...

August 3, 2025 7:31 PM

views 15

फिलीपिन्सचे राष्ट्राध्यक्ष पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर

फिलीपिन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांद आर मार्कोस ज्युनियर पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. नवी दिल्लीत उद्या दुपारी त्यांचं आगमन होईल. त्यांच्या पत्नी लुईस अरानेता मार्कोस आणि कॅबिनेट मंत्र्यांचं शिष्टमंडळ त्यांच्यासोबत असेल. या दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मार्कोस यांच्यात द्विपक्षीय ...

August 3, 2025 6:59 PM

views 24

संपूर्णता अभियानामधील कामगिरीसाठी चंद्रपूर जिल्ह्याला सुवर्णपदक

आकांक्षित जिल्हे आणि तालुके या कार्यक्रमांतर्गत गेल्या वर्षी जुलै ते सप्टेंबर या काळात राबवण्यात आलेल्या संपूर्णता अभियानामधील कामगिरीसाठी चंद्रपूर जिल्ह्याला सुवर्णपदक मिळालं आहे. चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या वतीने प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणव...

August 3, 2025 6:40 PM

views 39

Amravati : शासकीय मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन

अमरावती जिल्ह्यातल्या मोर्शी इथं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासकीय मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचं भूमीपूजन आणि कोनशिला अनावरण झालं. शेतकऱ्यांकडे कृषीच्या जोडीला एखादा जोडधंदा असेल तर त्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. मत्स्योत्पादनाद्वारे हे उद्दिष्ट साधलं जाऊ शकत, असं मुख्यमंत्री या...

August 3, 2025 6:37 PM

views 26

जनतेला उत्तम प्रशासनाचा प्रत्यय येण्यासाठी धोरणात्मक बदल करणार – मुख्यमंत्री

जनतेला उत्तम प्रशासनाचा प्रत्यय यावा यासाठी लवकरच धोरणात्मक बदल करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नागपूर इथल्या भारतीय व्यवस्थापन संस्था अर्थात 'आयएएम' च्या दोन दिवसीय परिषदेच्या अध्यक्षीय मार्गदर्शनात ते बोलत होते. प्रशासकीय यंत्रणेत बदल होण्याची भावना लक्षात घेऊन एप्रिल ...

August 3, 2025 6:21 PM

views 27

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. बिहारमधे  मतदारयाद्यांचं सखोल पुनरिक्षण  या मुद्द्यावरुन संसदेत विरोधी पक्ष कामकाज होऊ देत नसल्याबद्दल या भेटीत चर्चा झाल्याचं समजतं. राष्ट्रपती भवनाच्या समाजमाध्यम खात्यावर ही माहिती दिली आहे.

August 3, 2025 6:15 PM

views 26

कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज या उद्योजक संघटनेच्या विदर्भ विभागीय कार्यालयाचं उद्घाटन

विदर्भातली खनिजसंपत्ती, वन उत्पादनं, कापूस उद्योग या जमेच्या बाजू  विकासाच्या दृष्टीनं लक्षात घेऊन उद्योजकांनी पुढाकार घ्यावा त्याकरता केंद्र आणि राज्यसरकार सर्वतोपरि सहकार्य करेल असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज या उद्योज...

August 3, 2025 7:01 PM

views 15

राज्यात अवयवदान पंधरवड्याला प्रारंभ

राज्यात आज अवयवदान पंधरवड्याला प्रारंभ झाला आहे. अवयवदान व्यापक समाज चळवळीचे पाऊल या अनुषंगानं राज्याच्या सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागातर्फे राज्यभर हा उपक्रम राबवला जात आहे.   अवयवदान दिनानिमित्त आजपासून १५ ऑगस्टपर्यंत राज्यभरात अवयवदान पंधरवडा पाळला जात आहे. यानिमित्त जनजागृतीपर र...

August 3, 2025 3:28 PM

views 14

राष्ट्रीय महामार्ग विकासाला गती, मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते विविध प्रकल्पांचे उद्घाटन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आर्थिक विकासासाठी पायाभूत सुविधा मजबूत करत असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. आंध्र प्रदेशात मंगलागिरी इथं ५ हजार २३३ कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीच्या २७२ किमी लांबीच्या २९ राष्ट्रीय महामार्ग प्रक...