August 5, 2025 3:39 PM

views 15

महादेवी हत्तीणीला नांदणी मठात परत आणण्यासाठी राज्य शासनाचा पुढाकार

कोल्हापूर जिल्ह्यातल्या नांदणी मठातली महादेवी हत्तीण परत आणावी, ही जनभावना लक्षात घेत, राज्य शासन या संदर्भात स्वतंत्र पुनर्विचार याचिका दाखल करून सर्वोच्च न्यायालयात भूमिका मांडेल, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. महादेवी हत्तिणीच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्ष...

August 5, 2025 5:11 PM

views 50

पर्यायी व्यवस्था पूर्ण होईपर्यंत, कबुतरांना नियंत्रित खाद्यपुरवठा सुरू ठेवावा – मुख्यमंत्री

कबूतरखाना अचानक बंद करणे योग्य नाही, त्यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था पूर्ण होईपर्यंत मुंबई महापालिकेनं कबुतरांना नियंत्रित खाद्यपुरवठा सुरू ठेवावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मंत्रालयात घेतलेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. कबुतरांसाठी पर्यायी व्यवस्था होईपर्यंत त्यां...

August 5, 2025 3:06 PM

views 98

छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार जाहीर

राज्य सरकारनं यंदाचा छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार युनेस्कोमधले भारताचे प्रतिनिधी विशाल शर्मा आणि अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण संघाला जाहीर केला आहे. ३ लाख रुपये, मानचिन्ह, प्रमाणपत्र असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. हे या पुरस्कारांचं पहिलंच वर्ष आहे. ऐतिहासिक वारसा स्थळांचं जतन संवर्धन करणाऱ...

August 5, 2025 3:29 PM

views 20

एसटी महामंडळाच्या अतिरीक्त जमिनींचा व्यापारी तत्त्वावर वापर करायच्या सुधारित धोरणाला मंजुरी

राज्य सरकारनं एसटी महामंडळाच्या अतिरीक्त जमिनींचा व्यापारी तत्त्वावर वापर करायच्या सुधारित धोरणाला मंजुरी दिली आहे. राज्य मंत्रीमंडळाच्या आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता आणि नाविन्यता धोरणालाही सरकारनं मान्यता दिली आहे. कुष्ठरुग्णांसाठी कार्यरत स्वयंसेवी...

August 5, 2025 3:30 PM

views 13

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या पुरुषांना नोटीस

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या १४ हजार पुरुषांना पैसे परत करण्याची नोटीस राज्य सरकारनं पाठवली आहे. महिनाभरात पैसे परत नाही दिले नाही तर गुन्हा दाखल करण्याचा इशारा सरकारनं त्यांना नोटीशीद्वारे दिला आहे. योजना सुरू झाल्यापासून सुमारे साडे २१ कोटी रुपये या पुरुषांच्या खात्यात जमा झाल...

August 5, 2025 2:42 PM

views 36

अँडरसन-तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिका बरोबरीत सुटल्यामुळे भारत जागतिक कसोटी विजेतेपदाच्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर

अँडरसन-तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेत इंग्लंडबरोबर साधलेल्या गुणांच्या बरोबरीमुळे भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. ओव्हल इथे झालेल्या या कसोटी सामन्यापूर्वी इंग्लंड गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर होता. काल झालेल्या या मालिकेतल्या शेवटच्या सामन्यात भारतानं ...

August 5, 2025 2:36 PM

views 35

UPI व्यवहारांनी प्रथमच ७० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला

युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस अर्थात UPI वरून केल्या जाणाऱ्या दैनंदिन व्यवहारांनी पहिल्यांदाच ७० कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया -NPCI नं प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालानुसार, २ ऑगस्ट रोजी UPI व्यवहारांची संख्या सुमारे ७० कोटी ७० लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे.  ...

August 5, 2025 3:32 PM

views 16

जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचं निधन

जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचं आज प्रदीर्घ आजारानंतर निधन झालं. ते ७९ वर्षांचे होते. नवी दिल्लीच्या राममनोहर लोहिया रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.      संविधानाचं ३७०वं कलम रद्द करुन जम्मूकाश्मीरचा विशेष दर्जा काढून घेण्याची कारवाई सत्यपाल मलिक यांच्या कार्यकाळात झाली...

August 5, 2025 1:42 PM

views 17

राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाची बैठक

रालोआ म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाची बैठक आज नवी दिल्लीत झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह रालोआचे इतर खासदार यावेळी उपस्थित होते.    ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेव यशस्वीपणे राबवल्...

August 5, 2025 1:29 PM

views 34

दोन्ही सभागृहांचं कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब

बिहार मधल्या मतदारयाद्यांच्या पुनरीक्षण मुद्द्यावरून विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केलेल्या गदारोळानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं.     लोकसभेचं कामकाज सुरु होताच काँग्रेस, द्रमुक, तृणमूल काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी हौद्यात उतरून घोषणाबा...