August 13, 2025 8:26 PM

views 23

वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल पवार यांना ईडीकडून अटक

वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल पवार यांना ईडीनं आज अटक केली. त्यांच्यासह शहराचे माजी नगर नियोजक वाय. एस. रेड्डी आणि इतर दोघांनाही ईडीनं अटक केली. काही दिवसांपूर्वी ईडीनं या सर्वांवर धाड टाकली होती आणि त्यांची चौकशी केली होती. अवैध बांधकामांना परवानगी देण्यासाठी पैसे घेतल्याचा त्यांच्यावर आरो...

August 13, 2025 3:11 PM

views 14

ऑलिंपिक पदक विजेता सुशील कुमारचा जामीन रद्द

सर्वोच्च न्यायालयानं ऑलिंपिक पदक विजेता सुशील कुमारचा जामीन रद्द केला आहे. कनिष्ठ राष्ट्रीय कुस्ती विजेता सागर धनखड याच्या हत्या प्रकरणातील तो प्रमुख आरोपी असून दिल्ली उच्च न्यायालयानं त्याला जामीन मंजूर केला होता.   हा आदेश न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा यांच्या पीठ...

August 13, 2025 3:07 PM

views 29

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज पुण्यतिथी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज पुण्यतिथी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यादेवी होळकर यांना आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशातून अभिवादन केलं आहे. कुशल प्रशासक, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना स्मृतिदिनी त्रिवार वंदन असं मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणाले आहेत. तर उपमुख्यमंत...

August 13, 2025 3:03 PM

views 23

वसई विरार महानगर पालिकेने ६ हजार ६५२ गोविंदांचा काढला विमा

दहिहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वसई विरार महानगर पालिकेने ६ हजार ६५२ गोविंदांचा विमा काढला आहे. विमा अर्ज सादर केल्याच्या तारखेपासून ते १७ ऑगस्टपर्यंत हा विमा लागू असेल. विम्याचं संरक्षण मिळालं असलं तरी उत्सवाच्या ठिकाणी आयोजकांनी सुरक्षेच्या सर्व उपाययोजना कराव्यात...

August 13, 2025 2:59 PM

views 16

ठाण्याजवळ भिवंडी इथं सुमारे ३२ कोटीचे अंमली पदार्थ जप्त

ठाणे जिल्ह्यात भिवंडी बायपासवर ठाणे पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ जप्त केले. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून तनवीर दोन  आंतरराज्य ड्रग्ज तस्करांना अटक केली. त्यांच्याकडून सुमारे ३२ कोटी रुपयांच्या अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. आज त्यांना न्या...

August 13, 2025 2:55 PM

views 23

देशातल्या २१० पंचायत प्रतिनिधींना नवी दिल्लीत होणाऱ्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचं विशेष आमंत्रण

देशातल्या २८ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातल्या मिळून २१० पंचायत प्रतिनिधींना नवी दिल्लीत होणाऱ्या यंदाच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. आपापल्या गावात पायाभूत सुविधा, सार्वजनिक सेवा, आणि सामूहिक उपक्रम राबवून सुधारणा घडवणाऱ्या सरपंचांना विशेष पाहुणे म्हणून आमंत्रण देण्य...

August 13, 2025 2:52 PM

views 30

देशभरातल्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मानले आभार

व्यापार करारांबाबतच्या इतर देशांच्या दबावाला बळी न पडता शेतकऱ्यांच्या हितासाठी धाडसी निर्णय घेतल्याबद्दल देशभरातल्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. शेतकरी संघटनांचे नेते आणि शेतकरी यांनी काल केंद्रिय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांची भेट घेऊन कृतज्ञता व्यक्त केली. &nb...

August 13, 2025 2:50 PM

views 14

परराष्ट्र मंत्रालयाकडून ओसीआयबाबतच्या नियमांमध्ये सुधारणा

भारतीय वंशाच्या परदेशी नागरिकांना देण्यात येणाऱ्या परदेशी भारतीय कार्डाबाबत  नियमांमध्ये केंद्रीय गृहमंत्रालयाने काही सुधारणा केल्या आहेत.   एखाद्या ओसीआय नागरिकाला दोन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त तुरुंगवासाची शिक्षा झाली असेल किंवा सात वर्षांपेक्षा जास्त तुरुंगवासाच्या शिक्षेसाठी आरोपपत्र दाखल...

August 13, 2025 2:42 PM

views 10

भारताच्या गुलवीर सिंगचा बिगर ऑलिम्पिक स्पर्धेत विश्वविक्रम

बुडापेस्ट इथं सुरू असलेल्या ग्युलई इस्तवान मेमोरियल हंगेरियन ऍथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या गुलवीर सिंगने ३ हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत पाचवं स्थान पटकावून बिगर ऑलिम्पिक स्पर्धेत विश्वविक्रम रचला. हे अंतर त्याने ७ मिनिटं ३४ सेकंद  ४९ मिनिसेकंदात पूर्ण केलं. गुलवीरची ही युरोपमधली ही पहिली ट्रॅक रेस ह...

August 13, 2025 2:36 PM

views 14

ग्रीसमध्ये वनक्षेत्रात लागत असलेल्या वणव्यांमुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत

ग्रीसमध्ये वनक्षेत्रात लागत असलेल्या वणव्यांमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. वणव्यांंमुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. तर घरं, शेती आणि औद्योगिक सुविधांचं नुकसान होत आहे.     ग्रीस मधे गेल्या २४ तासांत ८२ वणवे लागले असून त्यापैकी २३ वणवे अद्याप सक्रिय आहेत. जोरदार वाऱ्यांमुळे आग आणखी पस...