August 14, 2025 2:47 PM

views 5

मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशात जनजीवन विस्कळीत

हिमाचल प्रदेशात सुरू असलेल्या पावसामुळे आणि ढगफुटीमुळे पंजाबमध्ये नद्यांची जलपातळी वाढली आहे. सतलज आणि बियास नद्या धोक्याच्या पातळीवरुन वाहत आहे. नागरिकांसाठी अन्न, पाणी, औषधे आणि इतर आवश्यक व्यवस्था करण्यात आली असल्याचं प्रशासनानं सांगितलं. बाधित क्षेत्रांमध्ये राज्य आपत्ती दल आणि वैद्यकीय चमू सज्ज...

August 14, 2025 2:43 PM

views 2

देशाची फाळणी आणि भीषण संहाराच्या स्मृतिप्रित्यर्थ देशभरात विभाजन विभिषिका दिवसाचं आयोजन

देशभरात आज विभाजन विभिषिका दिवस पाळला जात आहे. स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर देशाची झालेली फाळणी आणि त्यावेळेस झालेल्या भीषण संहाराच्या स्मृतिप्रित्यर्थ हा दिवस पाळला जात आहे. या अनुषंगाने देशभरात आज फाळणीच्या आठवणी दाखवणाऱ्या छायाचित्र प्रदर्शनांसह विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. प्रधानमंत्री...

August 14, 2025 2:44 PM

views 20

दिल्लीतल्या भटक्या कुत्र्यांबाबतचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं राखून ठेवला

दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातली सगळ्या भटक्या कुत्र्यांना निवारा केंद्रांमध्ये हलवण्याच्या निर्देशाला स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयानं आज निकाल राखून ठेवला. न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या पीठानं या विषयाची स्वतःहून दखल घेऊन दिलेल्...

August 14, 2025 1:39 PM

views 9

विख्यात हॉकीपटू वीसे पेस यांचं निधन

विख्यात हॉकीपटू वीसे पेस यांचं आज कोलकाता इथं वयाच्या ८०व्या वर्षी निधन झालं. प्रसिद्ध टेनिसपटू लिअँडर पेस यांचे ते वडील होते. गेल्या काही वर्षांपासून ते पार्किन्ससने आजारी होते आणि त्यांना मंगळवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज त्यांची प्राणज्योत मालवली. १९७२च्या म्युनिक ऑलिम्पिकमध्ये कांस्य...

August 14, 2025 12:56 PM

views 13

राजकीय व्यक्तींकडून वापरण्यात येणाऱ्या वोट चोरी शब्दावर निवडणूक आयोगाचा आक्षेप

राजकीय व्यक्तींकडून वापरण्यात येणाऱ्या वोट चोरी या शब्दावर केंद्रीय निवडणूक आयोगानं आक्षेप घेतला आहे. अशा प्रकारचे शब्द भारतीय मतदारांच्या प्रतिष्ठेवर आणि आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या प्रामाणिक पणावर आघात केल्यासारखं असल्याचं त्यांंनी म्हटलं आहे. एक व्यक्ती एक मत हे तत्त्व पहिल्या  निवडणुकीपासून लागू अस...

August 14, 2025 12:56 PM

views 9

अमेरिकेनं युक्रेनबाबत एकतर्फी  तोडगा काढू नये असं युरोपियन नेत्यांचं आवाहन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उद्या होणाऱ्या रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन  यांच्या बरोबरच्या  बैठकीत युक्रेन बाबत एकतर्फी  तोडगा काढू नये. असं आवाहन युरोपियन नेत्यांनी केलं आहे. जर्मनीचे व्हाईस चांसलर फ्रेडरिक मर्ज यांच्या बरोबर झालेल्या दृरदृश्य बैठकीत हे आवाहन करण्यात आलं. या बैठकी...

August 14, 2025 12:46 PM

views 24

जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा पुन्हा बहाल करण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा पुन्हा बहाल करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी या याचिकेला विरोध दर्शवल्यानंतर, सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या पीठानं जम्मू-काश्मीरमधल्या सद्यस्थितीकडे दुर्लक्...

August 13, 2025 8:18 PM

views 40

भारतीय पुरुष फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी माजी आंतराष्ट्रीय फुटबॉलपटू खालिद जमील यांची नियुक्ती

भारतीय पुरुष फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी माजी आंतराष्ट्रीय फुटबॉलपटू खालिद जमील यांची नियुक्ती झाली आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने ही नियुक्ती जाहीर केली असून खालिद जमाल यांचा कार्यकाळ २ वर्षांचा असेल. जमील यांनी जमशेदपूर, नॉर्थ-ईस्ट युनायटेड, ईस्ट बंगाल, मोहन बगान आणि मुंबई अशा विविध फुटब...

August 13, 2025 8:10 PM

views 28

अमेरिकनं लादलेल्या अतिरिक्त आयात शुल्काचा मर्यादित परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होईल – मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन

अमेरिकनं लादलेल्या अतिरिक्त आयात शुल्काचा मर्यादित परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होईल, तीन ते सहा महिन्यानंतर हे नुकसान भरून काढू असा विश्वास मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांनी आज व्यक्त केला. दागदागिने, कोळंबी आणि वस्त्रोद्योग क्षेत्राला सध्या या आयात शुल्काचा मोठा फटका बसतो आहे. पण सर...

August 13, 2025 8:26 PM

views 8

भारत-सिंगापूरदरम्यान नवी दिल्लीत मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेत चर्चा

भारत-सिंगापूर मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेचा तिसरा टप्पा आज नवी दिल्लीत पार पडला. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव आणि वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल तर सिंगापूरचे उपप्रधानमंत्री गॅन किम योंग आणि परराष्ट्र व्यवहार मंत्र...