August 19, 2025 7:29 PM

views 51

राज्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

  मुंबई शहर आणि उपनगरांत जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या रुळांवर पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला. अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या. शहरातल्या अनेक रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतूक ठप्प झाली. बेस्ट बसगाड्यांचे मार्ग वळवण्यात आले.      ठाणे जिल्ह्यात भिवंडी, मुंब्र...

August 19, 2025 7:58 PM

views 24

गणेशोत्सवासाठी रेल्वेच्या जादा गाड्या

राज्यातल्या गणेशभक्तांच्या सोयीसाठी यंदा रेल्वेनं गाड्यांच्या ३६७ अतिरिक्त फेऱ्या सोडण्याचं नियोजन केलं आहे. यासाठी गणेशभक्तांच्या वतीनं आपण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. गणेशोत्सवासाठी रेल्वेच्या जाद...

August 19, 2025 7:41 PM

views 34

आशिया चषक टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा

आशिया चषक टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. या संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव असेल. शुभमन गिल याच्याकडे उपकर्णधार पदाची धुरा असेल. या संघात अभिषेक शर्मा, टिळक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप या...

August 19, 2025 7:59 PM

views 4

ज्येष्ठ चरित्र अभिनेता अच्युत पोतदार यांचं निधन

ज्येष्ठ अभिनेता अच्युत पोतदार यांचं काल रात्री ठाण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयात निधन झालं. ते ९१ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर ठाण्यातल्या स्मशानभूमीत आज अंत्यसंस्कार करण्यात आले.   लष्करातून कॅप्टन म्हणून १९६७ मधे निवृत्त झाल्यानंतर इंडियन ऑईलमधे नोकरीत असताना त्यांनी अभिनयाचा छंद जोपासला...

August 19, 2025 5:05 PM

views 17

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी इंडी आघाडीकडून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी

उपराष्ट्रपतीपदाच्या आगामी निवडणुकीसाठी इंडी आघाडीकडून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. इंडी आघाडीच्या सर्व घटकपक्षांनी एकमताने रेड्डी यांच्या नावाला संमती दिल्याची माहिती काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज नवी दिल्लीत इंडी आघाडीच्या घ...

August 19, 2025 4:49 PM

views 14

राज्यात ४२,८९२ कोटी रुपयांची गुंतवणूक करारांवर स्वाक्षऱ्या

सौरऊर्जा आणि विदा क्षेत्रातल्या १० सामंजस्य करारांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात स्वाक्षऱ्या झाल्या. या सामंजस्य करारांमुळे राज्यात ४२ हजार ८९२ कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून २५ हजार ८९२ रोजगारांची निर्मिती होणार असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.  ...

August 19, 2025 4:57 PM

views 37

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ निर्णय…

मुंबईतल्या टाटा मेमोरियल सेंटरच्या एकात्मिक आयुर्वेदिक कर्करोग दवाखाना आणि संशोधन केंद्रात १०० खाटांचं रुग्णालय उभारण्यासाठी मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाने घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक आज मुंबईत झाली. राज्यातल्या शासकीय वैद्यक...

August 19, 2025 11:55 AM

views 22

मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागात पावसाचं थैमान

मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागात पावसाचं थैमान अखंड सुरू आहे. मुंबई शहर आणि उपनगरांत आज सकाळपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. यामुळे पश्चिम वाहतूक, लोकलसेवा आणि जनजीवन विस्कळीत झालं आहे. आज सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या २४ तासांत विक्रोळीत २५५ मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. भायखळ्यात २४...

August 19, 2025 11:20 AM

views 19

चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार

भारत दौऱ्यावर असलेले चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. तसंच भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यासमवेत सीमा प्रश्नावर विशेष प्रतिनिधींच्या चर्चेच्या 24 व्या फेरीत वांग यी सहभागी होणार आहेत.   राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांसोबतच्या बैठकी...

August 19, 2025 11:16 AM

views 15

समृद्धीला चालना देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याची प्रधानमंत्र्यांची ग्वाही

समृद्धीला चालना देण्यासाठी विविध क्षेत्रांमध्ये जलद सुधारणा करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर व्यक्त केलं आहे. अत्याधुनिक सुधारणांच्या आराखडयाचा आढावा घेण्यासाठी काल झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर प्रधानमंत्र्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली, या बैठकी...