August 23, 2025 1:13 PM

views 21

पाकव्याप्त काश्मीरमध्ये हिमनदी फुटल्यामुळे महापूर

पाकव्याप्त काश्मीरमध्ये गिलगिट-बाल्टिस्तानच्या घिझर जिल्ह्यात हिमनदी फुटल्यामुळे महापूर आला असून, भूस्खलन झाल्यामुळे  ३०० पेक्षा जास्त घरं  आणि दुकानं उद्ध्वस्त झाली आहेत.   या भागातला मोठा भूप्रदेश पुराच्या पाण्याखाली आल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. बचाव पथकांनी आतापर्यंत २०० पेक्षा ज...

August 23, 2025 1:05 PM

views 22

न्यूयॉर्क स्टेट थ्रूवे इथं एका प्रवासी बसचा अपघात होऊन 5 जणांचा मृत्यू

न्यूयॉर्कच्या पश्चिम भागातल्या न्यूयॉर्क स्टेट थ्रूवे इथं एका प्रवासी बसचा अपघात होऊन पाच जणांचा मृत्यू झाला आहे. नायगारा फॉल्सकडून न्यूयॉर्ककडे जाताना चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला.   बसमध्ये ५२ प्रवासी होते, काहींना बसमधून बाहेर काढण्यात यश आलं आहे तर काही जण अद्यापही बसमध्ये अडकल्...

August 23, 2025 12:58 PM

views 24

उत्तराखंडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांना जोरदार पावसाचा फटका

उत्तराखंडमध्ये, चामोली जिल्ह्यात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे थरली तालुक्यात मोठं नुकसान झाल्याचं वृत्त आहे. थरली तालुका मुख्यालय, केदारबागड, राडीबागड आणि चेपाडोसह अनेक भागांना जोरदार पावसाचा फटका बसला आहे.   निवासी इमारती, दुकानं आणि सरकारी कार्यालयांमध्ये पावसाच्या पाण्याबरोबर आलेला ...

August 23, 2025 12:54 PM

views 3

पंजाबच्या होशियारपूरमध्ये एलपीजी टँकरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत दोघांचा मृत्यू

पंजाबच्या होशियारपूरमध्ये काल मध्यरात्री एका एलपीजी टँकरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत दोघांचा मृत्यू झाला, तर इतर २३ जण गंभीर जखमी झाले. जखमींना होशियारपूरच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून १५ जणांना विशेष रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. तूर्तास हा मार्ग वाहतुकीसाठी बंद आहे.

August 23, 2025 12:47 PM

views 17

ट्रम्प यांचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरी आणि कार्यालयांवर FBIचे छापे

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरी आणि कार्यालयांवर FBIनं छापे टाकले आहेत. त्यांच्यावर गुप्त माहितीचा दुरुपयोग केल्याचा आरोप आहे.   २०१९ मध्ये ट्रम्प यांची साथ सोडल्यानंतर बोल्टन हे ट्रम्प यांचे टीकाकार झाले आहेत. याप्रकरणी बोल्ट...

August 23, 2025 12:43 PM

views 22

सर्जिओ गोर यांची अमेरिकेचे भारतातले नवे राजदूत म्हणून नियुक्ती

 अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्जिओ गोर यांची अमेरिकेचे भारतातले नवे राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे. दक्षिण आणि मध्य आशियासाठी विशेष दूत म्हणूनही ते काम करतील. अमेरिकेला पुन्हा महान करण्याचं आपलं ध्येय साध्य करण्यासाठी गोर यांच्यासारख्या व्यक्तीची गरज होती, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

August 23, 2025 12:40 PM

views 7

श्रीलंकेचे माजी अध्यक्ष रानील विक्रमसिंघे यांना २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

श्रीलंकेचे माजी अध्यक्ष रानील विक्रमसिंघे यांना न्यायालयानं सरकारी निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी २६ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली आहे. २०२३ मध्ये ब्रिटनच्या खासगी दौऱ्यात सरकारी निधीचा गैरवापर केल्याच्या आरोपाखाली काल त्यांना अटक झाली होती.   याप्रकरणी त्यांना जामीन नाकारण्यात आला आहे. आपल्या पत्नीच...

August 23, 2025 12:37 PM

views 39

५६वी जीएसटी परिषद येत्या ३ आणि ४ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत होणार

जीएसटी परिषदेची ५६वी बैठक येत्या ३ आणि ४ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील.   जीएसटीमधला १२ आणि २८ टक्क्यांचा टप्पा हटवण्याचा निर्णय या बैठकीत होण्याची शक्यता आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरच्या ...

August 23, 2025 12:21 PM

views 10

जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या काजल दोचकला सुवर्ण पदक

२० वर्षांखालच्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या काजल हिनं महिलांच्या ७२ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं. बल्गेरिया इथं झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत तिनं अटीतटीच्या सामन्यात चीनच्या प्रतिस्पर्ध्याचा ८-६ असा पराभव केला.   दुसरीकडे महिलांच्या ५३ किलो वजनी गटात सारिका हिनं, तर ५...

August 23, 2025 10:27 AM

views 16

एक मजबूत संरक्षण यंत्रणा देश तयार करत आहे- संरक्षणमंत्री

नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीला प्रोत्साहन देऊन आणि स्थानिक कंपन्यांना वाढीसाठी पोषक वातावरण तयार करुन एक मजबूत संरक्षण यंत्रणा देश तयार करत आहे, असं प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काल नवी दिल्लीत एका कार्यक्रमात केलं.   पाचव्या पिढीचं लढाऊ विमान आणि विमानांचं इंजिन तयार करणं त...