September 30, 2025 4:49 PM

views 143

राज्य मंत्रिमंडळ निर्णय

राज्य सरकार कर्करोग उपचारासाठी सर्वसमावेशक असं धोरण आखून प्रत्येक जिल्ह्यात नागरिकांना कर्करोगावर दर्जेदार उपचार उपलब्ध करुन देणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय झाला. त्यानुसार त्रिस्तरीय समग्र कर्करोग उपचार सेवा निश्चित केली जाईल. राज्यभरात १८ रुग्णालयांमधे कर्करोगाशी ...

September 30, 2025 1:28 PM

views 62

GST Reforms : क्रीडा साहित्यांवर केलेल्या कर सुधारणांविषयी जाणून घ्या…

वस्तू आणि सेवा कररचनेतल्या सुधारणा २२ तारखेपासून लागू झाल्या आहेत. त्यात क्रीडा साहित्याबाबत केलेल्या कर सुधारणांविषयी आज जाणून घेऊया…   केंद्रसरकारने वस्तू आणि सेवा करामध्ये केलेल्या सुधारणांमध्ये खेळणी आणि क्रीडा साहित्यावरचा वस्तू आणि सेवा कर १२ टक्क्यांवरुन ५ ट्क्क्यांवर आणला आहे.  या सुधारणेमुळ...

September 30, 2025 1:14 PM

views 35

SevaParv: शिक्षण क्षेत्रात सुधारणा

सेवा आणि सुशासन या मार्गदर्शक तत्त्वांनुसार वाटचाल करत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार सतत कार्यरत आहे. सेवा पर्व या मालिकेत आज आपण शिक्षण क्षेत्रातल्या सुधारणांबद्दल जाणून घ्या...   मागील अकरा वर्षांमध्ये शाळांपासून विद्यापीठांपर्यंत शिक्षण व्यवस्थेला बळकटी आणण्याच्या बाबती...

September 30, 2025 1:06 PM

views 44

त्री-सेवा परिषदेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं संबोधन

एकविसाव्या शतकात सशस्त्र दलांमधली परस्परांबरोबर  समन्वय साधून काम करण्याची क्षमता आणि एकता, ही परिचालनात्मक गरज बनली आहे, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं त्री-सेवा परिषदेत बोलत होते. सुरक्षेपुढले धोके गुंतागुंतीचे बनले आहेत, असं  ते यावेळी म्हणाले.    ऑपरेश...

September 30, 2025 12:39 PM

views 42

करूर चेंगराचेंगरी दुर्घटनेचं तथ्य शोधण्यासाठी रालोआचं शिष्टमंडळ कोइम्बतूरमध्ये दाखल

तमिळनाडूमधल्या करूर इथं सभेत चेंगराचेंगरी होऊन झालेल्या दुर्घटनेचं तथ्य शोधण्यासाठी खासदार हेमामालिनी यांच्या नेतृत्वाखालील रालोआचं शिष्टमंडळ आज कोइम्बतूरमध्ये दाखल झालं. या दुर्घटनेमागच्या कारणांचा शोध ही समिती घेईल, असं खासदार हेमामालिनी यांनी वार्ताहरांना सांगितलं. हे शिष्टमंडळ मृतांच्या कुटुंबीय...

September 30, 2025 12:32 PM

views 14

‘दुर्गा पूजा’ उत्सवानिमित्त देशवासियांना शुभेच्छा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दुर्गा पूजा उत्सवानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. हा उत्सव देशाची संस्कृती, श्रद्धा आणि आध्यात्मिक वारशाचं प्रतीक आहे, अशी भावना राष्ट्रपतींनी व्यक्त केली. महिलांचा सन्मान राखण्यासाठी आणि समाजात त्य...

September 30, 2025 12:26 PM

views 15

आज ‘आंतरराष्ट्रीय अनुवाद दिवस’

आज आंतरराष्ट्रीय अनुवाद दिवस साजरा होत आहे. आजचा दिवस, विविध  देशांना एकत्र आणून, परस्पर संवाद, आणि सहयोग वाढवण्यात, तसंच विकासामध्ये योगदान देऊन जागतिक शांतता आणि सुरक्षा मजबूत करण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या भाषा तज्ज्ञांच्या कामाप्रति आदरभाव व्यक्त करण्याची संधी देतो. २०१७ साली, संयुक्त राष्ट्...

September 30, 2025 12:22 PM

views 25

अतिवृष्टीग्रस्तांसाठी सिद्धिविनायक मंदिरातर्फे कोटींची मदत

राज्यातल्या अतिवृष्टीग्रस्तांसाठी मुंबईच्या श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासानं  १० कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये गेले काही दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांमधलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. तसंच शेतीचं आणि नागरिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर हा निर...

September 30, 2025 9:11 PM

views 91

बिहारमध्ये अंतिम मतदार यादी प्रसिद्ध, साडे २१ लाख मतदारांची वाढ

बिहारमध्ये विशेष मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेच्या नंतर विधानसभा निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली. मसुदा मतदार यादीच्या तुलनेत या यादीत २१ लाख ५३ हजार मतदार वाढले आहेत तर ३ लाख ६६ हजार मतदार कमी झाले आहेत.    २४ जून २००५ रोजी ७ कोटी ८९ लाख मतदार बिहारमध्ये होते. त्यातले ६५ लाख मसुदा या...

September 30, 2025 10:32 AM

views 52

कॅनडाकडून ‘बिश्नोई समूह’ दहशतवादी संघटना म्हणून सुचीबद्ध

कॅनडाने बिश्नोई समूहाला फौजदारी संहितेअंतर्गत दहशतवादी संघटना म्हणून सुचीबद्ध केले आहे. या कारवाईमुळे, कॅनडाच्या कायदा अंमलबजावणी संचालनालयामार्फत या गटाची मालमत्ता, वाहने, संपत्ती जप्त केली जाऊ शकते. त्यामुळे समूहाला होणारा वित्तपुरवठा, प्रवास आणि नवी भरती यांसंदर्भातल्या दहशतवादी गुन्ह्यांवर कारवा...