September 30, 2025 7:41 PM

views 34

व्हिएतनाममधल्या ‘बुआलोई’ चक्रीवादळात २६ जणांचा मृत्यू, तर २२ बेपत्ता

व्हिएतनाममधल्या ‘बुआलोई’ चक्रीवादळात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २६ वर पोहोचली असून, २२ जण अद्याप बेपत्ता आहेत. वादळाबरोबर झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूर आला असून, विमान आणि रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.   गेल्या २४ तासांमध्ये  व्हिएतनामच्या अनेक भागात ३०० मिलिमीटरपेक्षा जास्त पा...

September 30, 2025 7:35 PM

views 40

ऊस लागवडीशी संबंधित आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी एक विशेष पथक स्थापन करणार

देशातल्या ऊस लागवडीशी संबंधित आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदे अंतर्गत एक विशेष पथक स्थापन केलं जाईल, असं केंद्रीय कृषी आणि ग्राम  विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी घोषित केलं आहे. ते आज नवी दिल्लीत शाश्वत ऊस अर्थव्यवस्थेवरच्या राष्ट्रीय सल्लामसलत बैठकीला दूरदृश्य प्रणालीच्या...

September 30, 2025 7:33 PM

views 30

पाकिस्तानात झालेल्या शक्तिशाली कार बॉम्बस्फोटात ८ जण ठार, तर १९ जण जखमी

पाकिस्तानमध्ये, क्वेटा फ्रंटियर कॉन्स्टेब्युलरी एफसी मुख्यालयाबाहेर आज झालेल्या शक्तिशाली कार बॉम्बस्फोटात ८ जण ठार, तर १९ जण जखमी झाले. बलुचिस्तानमध्ये दीर्घ काळापासून ‘बलुच लिबरेशन आर्मी’ सारख्या गटांचा हिंसाचार सुरु आहे. ३ सप्टेंबर रोजी क्वेट्टा इथं एका राजकीय रॅलीमध्ये  झालेल्या आत्मघातकी बॉम्बस...

September 30, 2025 7:30 PM

views 43

दूरसंचार विभागाच्या ‘संचार साथी’ उपक्रमाने मोबाईल चोरीला आळा

दूरसंचार विभागाच्या ‘संचार साथी’ उपक्रमाने, हरवलेले आणि चोरीला गेलेले  6 लाखांपेक्षा जास्त मोबाईल हँडसेट परत मिळवून एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. या यशामुळे नागरिकांचा डिजिटल प्रशासनावरचा विश्वास आणखी दृढ झाला आहे. ‘डिजिटल बाय डिझाइन’ या संकल्पनेवर आधारित संचार साथी उपक्रमाने मोबाईल चोरीला आळा घालण...

September 30, 2025 7:12 PM

views 16

शांततापूर्ण वातावरण असल्यामुळे लडाख लेहमध्ये सार्वजनिक निर्बंध शिथिल

लडाखमध्ये लेह इथे आज शांततापूर्ण वातावरण असल्यामुळे सार्वजनिक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. निर्बंध शिथिल झाल्यामुळे लेहमध्ये स्थानिक नागरिकांनी किराणा, जीवनावश्यक वस्तू आणि भाजीपाला खरेदी केला. तसंच, बांधकामप्रवण क्षेत्रावर कामगारांनी त्यांचं काम पुन्हा सुरू केलं. लेहमध्ये इतर निर्बंध शिथिल करण्य...

September 30, 2025 6:59 PM

views 51

महाराष्ट्र-ऑस्ट्रेलिया इनोव्हेशन अँड स्किल्स हबच्या माध्यमातून विकासाला चालना मिळेल-चंद्रकांत पाटील

महाराष्ट्र-ऑस्ट्रेलिया इनोव्हेशन अँड स्किल्स हबच्या माध्यमातून ऊर्जा, पर्यावरण, आणि आरोग्य क्षेत्रात संशोधन, नवकल्पना व कौशल्य विकासाला चालना मिळेल, असा विश्वास उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. या हब बाबत आज मंत्रालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली आयोज्त बैठकीत ते बोलत ...

September 30, 2025 6:59 PM

views 43

सर्पदंशावर हाफकिननं तयार केलेल्या लशीची खरेदी MMGPA नं करावी- अजित पवार

सर्पदंशावर हाफकिन संस्थेनं तयार केलेली लस प्रभावी आणि परिणामकारक असून यध्या हाफकिनकडे या लशीच्या दीड लाख मात्रा तयार आहेत, त्यांची खरेदी महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणानं करावी, असे निर्देश  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. त्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात हाफकिन जीव औषध निर्माण म...

September 30, 2025 6:54 PM

views 64

राज्याचा ऊस गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासूर सुरू होणार – कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

राज्याचा ऊस गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासूर सुरू होणार असल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दिली. त्यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली.    राज्यातल्या ३३ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा जास्त फटका बसला आहे. प्राथमिक अंदाजानुसार सव्वा ते दीड कोटी एकर क्षेत्राचं नुकसान झालं आहे. ये...

September 30, 2025 6:51 PM

views 66

नैऋत्य मौसमी पावसाचा राज्यातला परतीचा प्रवास…

नैऋत्य मौसमी पावसाचा राज्यातला परतीचा प्रवास येत्या काही दिवसात सुरू होईल. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजपर्यंत गुजरातच्या बहुतांश भागातून हा पाऊस परतला आहे. त्यानंतर ५ ऑक्टोबरपर्यंत उत्तर महाराष्ट्रातून तर १० ऑक्टोबरपर्यंत राज्याच्या बहुतांश भागातून मान्सून परत जाईल. ऑक्टोबरच्या मध्यापर्यं...

September 30, 2025 4:56 PM

views 77

राज्यात पूरग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा ओघ सुरू

राज्यात अनेक ठिकाणी पाऊस ओसरला असून पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी विविध धरणांमधून विसर्ग करण्यात येत आहे. जायकवाडी प्रकल्पातून सध्या १ लाख २ हजार क्युसेक्स इतका विसर्ग सुरू आहे. राज्यात पूरग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा ओघही सुरू झाला आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत म्हणून धार...