October 10, 2025 1:31 PM

views 32

‘दहशतवादाचा सामना करण्यासाठी भारत आणि अफगणिस्तानने एकत्र येऊन काम करण्याची गरज’

दहशतवादाचा सामना करण्यासाठी भारत आणि अफगाणिस्तानाने एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचा पुनरुच्चार परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी केला आहे. नवी दिल्ली इथे अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांच्याबरोबर झालेल्या भेटीनंतरच्या भाषणात ते बोलत होते. दोन्ही देशांची विकास आणि समृद्धब...

October 10, 2025 1:22 PM

views 99

आज मानसिक आरोग्य दिन

मानसिक आरोग्य दिन आज जगभरात साजरा केला जात आहे. मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांबाबत जनजागृती आणि मानसिक आरोग्य निरोगी राखण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना चालना देणं हा या दिवसाचा उद्देश आहे. आपत्ती आणि आणीबाणीच्या परिस्थितीत मानसिक आरोग्य अशी या वर्षीच्या जागतिक मानसिक आरोग्य दिनाची संकल्पना आह...

October 10, 2025 1:11 PM

views 56

भारत आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद २०२५ ची सर्व दालनं भरली

नवी दिल्लीत होणाऱ्या भारत आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद २०२५ ची सर्व दालनं भरली असल्याची माहिती भारतीय तांदूळ निर्यात महासंघानं दिली. ही परिषद ३० आणि ३१ ऑक्टोबरला भारत मंडपम इथं होणार आहे.    या परिषदेत सुमारे १५० तांदूळ उत्पादक सहभागी होणार असून त्यात तांदळाशी संबंधित विविध नवकल्पना, तंत्रज्ञान आ...

October 10, 2025 1:05 PM

views 216

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची अधिसूचना जारी

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची अधिसूचना आज जारी झाली. त्याबरोबरच, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली असून,  अर्ज भरण्याची अंतिम तारीख 17 ऑक्टोबर आहे. एकंदर 243 सदस्यांच्या विधानसभेसाठी दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 121 जागांसाठी, 6 नोव्हेंबर रोजी म...

October 10, 2025 9:47 AM

views 114

गाझा शांतता कराराला मान्यता दिल्याबद्दल प्रधानमंत्री मोदींकडून अमेरिका-इस्रायलचं कौतुक

गाझा शांतता कराराला मान्यता दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू यांचं अभिनंदन केलं आहे. ओलिसांची सुटका, इस्रायली सैन्याची माघार घेण्याचा आणि गाझाला मानवतावादी मदत साहित्याचा पुरवठा करण्याचा मार्ग मोकळा झाल्...

October 10, 2025 9:49 AM

views 203

भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान दुसरी क्रिकेट कसोटी आजपासून दिल्लीत

भारत आणि वेस्ट इंडिज पुरुष क्रिकेट संघांदरम्यानचा दुसरा आणि मालिकेतील अंतिम सामना आजपासून नवी दिल्लीतील अरुण जेटली मैदानावर सुरू होणार आहे. शुभमन गिल भारतीय संघाचं नेतृत्व करत आहे. या आधीचा सामना भारताने जिंकला असून हा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. फटकावलेल्या 94 धावा वि...

October 9, 2025 8:52 PM

views 57

जगभरातल्या देशांना आणि उद्योजकांना भारतात गुंतवणुकीसाठी प्रधानमंत्र्यांचं आवाहन

जगभरातल्या सर्व देशांनी भारतासोबत भागिदारी करावी आणि जगातल्या सर्व गुंतवणूकदारांनी भारताच्या आर्थिक वृद्धीच्या वेगात सहभागी व्हावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांच्यासोबत उद्योजकांना त्यांनी संबोधित केलं. &nbsp...

October 9, 2025 8:42 PM

views 23

भारतातून मोठी गुंतवणूक मिळेल अशी ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांना आशा

भारत आणि ब्रिटन हे नैसर्गिक भागीदार असून लोकशाही, स्वातंत्र्य आणि कायद्याचं राज्य या मूल्यांवरचा विश्वास हा या भागीदारीचा पाया असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मुंबईत आज राजभवनात ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांच्याशी प्रतिनिधी मंडळस्तरावर चर्चा झाल्यानंतर ते संयुक्तपणे पत्...

October 9, 2025 8:34 PM

views 19

तिसऱ्या तंबाखू मुक्त युवक मोहिमेचा प्रारंभ

तिसऱ्या तंबाखू मुक्त युवक मोहिमेचा प्रारंभ आज नवी दिल्ली इथं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांच्या उपस्थितीत झाला.  चित्रपट, दूरचित्रवाणी आणि ऑनलाईन  प्लॅटफॉर्मचं तंबाखू विरोधी संदेश आणि आरोग्याबाबत इशारा देत तंबाखूचा प्रसार रोखण्यात  भारतानं आघाडी घेतली आहे, असं पटेल ...

October 9, 2025 8:27 PM

views 13

स्वच्छता ही सेवा’ मोहिमेत दीड हजारापेक्षा जास्त ठिकाणं स्वच्छ केली-@MEA

माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं ‘स्वच्छता ही सेवा’ मोहिमेत दीड हजारापेक्षा जास्त ठिकाणं स्वच्छ केल्याचं मंत्रालयानं आज सांगितलं. या मोहिमेत स्वच्छता मोहिम, घरोघरी स्वच्छता, चित्रकला स्पर्धा, स्वच्छ रॅली आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसारखे २ हजार ७६६ कार्यक्रम घेतले. त्यात ५९ हजारांपेक्षा जास्त लोका...