October 10, 2025 3:27 PM

views 70

नागपुरात ओबीसी संघटनांचा महामोर्चा

नागपूरात आज ओबीसी संघटनांनी महामोर्चा आयोजित केला होता. कुणबी जातीच्या व्यक्तींना ओबीसी प्रमाणपत्र देण्याच्या संदर्भातला २ सप्टेंबरचा शासन आदेश रद्द करावा अशी त्यांची प्रमुख मागणी होती. मोठ्या संख्येने ओबीसी नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते. नागपुरात यशवंत चौकातून सुरू झालेला मोर्चा संविधान चौकात ...

October 10, 2025 3:45 PM

views 42

नागपुरात जागतिक दर्जाचं ‘कन्व्हेन्शन सेंटर’ उभारणार

सांस्कृतिक कार्यक्रमांना हक्काचं व्यासपीठ मिळावं याकरता  नागपुरात सर्व सोयी सुविधायुक्त जागतिक दर्जाचे ' कन्व्हेन्शन सेंटर' उभारण्यात येणार आहे. याप्रकल्पासाठी  स्पेन मधल्या फिरा बार्सिलोना इंटरनॅशनल कंपनीसमवेत  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज सामंजस्य करार करण्यात आला. नागपूरला उभा...

October 10, 2025 3:13 PM

views 56

नीती आयोगाचा कर धोरणावरच्या अहवालाचा दुसरा भाग प्रकाशित

नीती आयोगानं कर धोरणावरच्या अहवालाचा दुसरा भाग ‘भारतातील करांमधील बदल : गुन्हेगारीकरणाला आळा घालणे आणि विश्वासाधारित प्रशासन ’ आज नवीदिल्लीत प्रकाशित केला. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बीव्हीआर सुब्रमण्यम यांनी हा अहवाल प्रकाशित केला. सर्व प्रकारचे दिवाणी पर्याय संपुष्टात आल्यानंतर कोणत्या प...

October 10, 2025 3:46 PM

views 292

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने १५ टक्के मानधन वाढ काल जाहीर केली आहे. राज्यभरातल्या ५० हजार कर्मचाऱ्यांना जून २०२५ पासून या मानधनवाढीचा लाभ मिळेल. या कर्मचाऱ्यांच्या उर्वरित मागण्यांबाबतही शासन सकारात्मक असल्याचं आरोग्यमंत्री प्रकाश आबिटक...

October 10, 2025 3:46 PM

views 56

नैऋत्य मौसमी पावसाचा राज्यातून माघारीचा प्रवास

नैऋत्य मौसमी पावसाचा राज्यातून माघारीचा प्रवास आजपासून सुरू झाला. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार उत्तर आणि मध्य महाराष्ट्र, मुंबई, ठाणे यासारख्या परिसरातून मान्सूननं माघार घेतली आहे. येत्या काही दिवसात राज्याच्या इतर भागातूनही मान्सूनचा परतीचा प्रवास पूर्ण होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

October 10, 2025 2:58 PM

views 298

२०२५ चा शांततेचा नोबेल पुरस्कार व्हेनेझुएलाच्या मारिया कोरीना मच्याडो यांना जाहीर

२०२५चा शांततेचा नोबेल पुरस्कार व्हेनेझुएलाच्या मारिया कोरीना मच्याडो यांना जाहीर झाला आहे. व्हेनेझुएलामध्ये नागरिकांच्या लोकशाही हक्कांचं रक्षण आणि हुकुमशाहीपासून लोकशाहीकडे देशाची वाटचाल शांततेत व्हावी, यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार दिल्याची घोषणा नॉर्वेच्या नोबेल समितीनं केली.

October 10, 2025 2:53 PM

views 38

पीएम धन-धान्य कृषी योजना आणि दलहन आत्मनिर्भरता मोहिमेचा उद्या प्रारंभ

प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजनेचा प्रारंभ उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत पुसा इथं होणार आहे. या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दलहन आत्मनिर्भरता मोहिमेचं उद्घाटनही करतील. याच कार्यक्रमात शेतकऱ्यांसाठी ४२ हजार कोटी रुपयांहून अधिक मूल्यांच्या विविध योजनांचा ही प्रारं...

October 10, 2025 2:47 PM

views 278

महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची निवडणूक जाहीर

महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची निवडणूक दोन नोव्हेंबर रोजी पुण्यात होणार आहे. संघटनेचे विद्यमान अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य खो-खो संघटनेचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अध्यक्ष पदासाठी अर्ज भरला आहे. २०१३ पासून सलग तीन वेळा अजित पवार अध्यक्ष पदावर आहेत. महासचिव पदासाठी नामदेव शिरगावकर, तर खजिनदा...

October 10, 2025 1:37 PM

views 233

मतदान करण्यासाठी ओळखपत्रांपैकी कोणतेही एक सादर करता येईल – निवडणूक आयोग

मतदार यादीत नाव असलेल्यांना मतदान करण्यासाठी ओळखीचा पुरावा म्हणून मतदार ओळखपत्र किंवा इतर बारा पर्यायी ओळखपत्रांपैकी कोणतेही एक सादर करता येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. बिहार विधानसभा निवडणूक  तसंच इतर राज्यातल्या पोटनिवडणुकांच्या मतदारसंघात जवळपास सर्व  मतदारांना ओळखपत्र देण्यात आली आहेत...

October 10, 2025 1:35 PM

views 46

पाकिस्तान – अफगाणिस्तानमध्ये तणाव

काबुलमध्ये काल झालेल्या स्फोटांनंतर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधला तणाव वाढला आहे. या स्फोटांमुळे पूर्व काबुलमध्ये सरकारी कार्यालयं तसंच निवासी भागात घबराट पसरली. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा असिफ यांच्या सभेनंतर काही तासांत ही घटना घडली. या स्फोटांची जबाबदारी अद्याप कुणीही घेतलेली नाही.