October 11, 2025 8:07 PM

views 122

Maharashtra: जमीन मोजणीचा निपटारा आता ३० दिवसांत होणार

जमीन मोजणीचा निपटारा आता ३० दिवसांत होणार आहे. महसूल विभागानं यासाठी परवानाधारक खाजगी भूमापकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला असून, राज्य सरकारनं यासंदर्भातील अधिसूचना जारी केल्याचं महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे. या निर्णयामुळे राज्यात प्रलंबित असलेली सुमारे तीन कोटी १२ लाख मोज...

October 11, 2025 7:38 PM

views 30

डॉक्टरांच्या चिट्ठीशिवाय कफ सिरपची विक्री करणाऱ्या औषध विक्रेत्यांवर कारवाई

अन्न आणि औषध प्रशासनाने डॉक्टरांच्या चिट्ठीशिवाय कफ सिरपची विक्री करणाऱ्या औषध विक्रेत्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. डॉक्टरांच्या चिट्ठीशिवाय औषधे देणाऱ्या राज्यातल्या ८८ विक्रेत्यांना औषध विक्री बंदीचे आदेश देण्यात आले आहेत तर १०७ विक्रेत्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.   पुण्यात २० औष...

October 11, 2025 7:05 PM

views 66

महाराष्ट्र रणजी संघात बीडच्या सौरभ नवलेची यष्टिरक्षक म्हणून निवड

बीसीसीआयच्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ नुकताच जाहीर झाला. महाराष्ट्र रणजी संघात बीडचा यष्टिरक्षक, फलंदाज आणि सातारा वॉरियर्सचा कर्णधार सौरभ नवलेची यष्टिरक्षक म्हणून  निवड झाली आहे. सौरभच्या निवडीबद्दल अनेक स्तरातले मान्यवर आणि क्रिकेटप्रेमींनी शुभेच्छा दिल्या आहेत. छत्रपती संभ...

October 11, 2025 7:03 PM

views 43

राज्य शासनाचं कृत्रिम बुद्धिमत्ता स्विकारण्याचं धोरण सुरू- मुख्यमंत्री

राज्य शासनानं कृत्रिम बुद्धिमत्ता स्विकारण्याचं धोरण सुरू केलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. ते आज मुंबईत वांद्रे इथं मेहबुब स्टुडिओत एचपी आणि इंटेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘एचपी ड्रीम अनलॉक्ड’ या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. तंत्रज्ञान प्रत्येक भारती...

October 11, 2025 7:00 PM

views 73

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतल्या दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावात वेस्ट इंडिजची खराब सुरुवात

भारत आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघांदरम्यान नवी दिल्लीत सुरु असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा वेस्ट इंडिजनं भारताच्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना आपल्या पहिल्या डावात ४ गडी बाद १४० धावा केल्या आहेत.    त्याआधी, भारतानं आपला  पहिला डाव ५ बाद ५१८ धाव...

October 11, 2025 6:55 PM

views 51

बांबू लागवड ही केवळ शेती नसून टिकाऊ उपजीविकेचा मार्ग-पाशा पटेल

बांबू लागवड ही केवळ शेती नसून टिकाऊ उपजीविकेचा मार्ग आहे असं कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी म्हटलं आहे. ते आज वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात मनरेगा योजनेच्या सहाय्याने सुरू असलेल्या बांबू लागवड उपक्रमाच्या आढावा बैठकीत बोलत होते. बांबू लागवडीतून पर्यावरण संवर्धनाबरोबरच रोजगार निर्मिती आणि...

October 11, 2025 6:53 PM

views 51

Sultan of Johor Cup: भारताचा ग्रेटब्रिटनवर पराभव करत विजयी सलामी

१३व्या  सुलतान जोहर चषक  हॉकी स्पर्धेत भारताच्या  युवा संघाने गतविजेत्या ग्रेटब्रिटनचा  ३ विरुद्ध २ असा पराभव करुन विजयी सलामी दिली. कर्णधार रोहितने २ गोल केले तर पहिलाच गोल रवनीत सिंगने लगावला.  मलेशियात जोहोर बाहरु इथं सुरु असलेल्या या स्पर्धेत यजमान मलेशिया व्यतिरिक्त  ग्रेट ब्रिटन, न्यूझीलंड, पा...

October 11, 2025 1:41 PM

views 22

शेतकऱ्यांच्या मनातही स्वदेशीला प्राधान्य ही संकल्पना रुजत असल्याचं केंद्रीय कृषीमंत्र्यांचं प्रतिपादन

केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीही या कार्यक्रमाला संबोधित केलं. कृषी उपकरणांवर जीएसटी कमी केल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असं कृषीमंत्री म्हणाले. रब्बी पिकांच्या हमीभावात सरकारने वाढ केली, प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजने अंतर्गत ३ लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट लाभ हस...

October 11, 2025 1:40 PM

views 40

दिवाळी आणि छट पूजेनिमित्त विक्रमी संख्येनं जादा गाड्या उपलब्ध होणार

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्ली रेल्वे स्थानकाला भेट देत नव्याने सुरु झालेल्या यात्री सुविधा केंद्राची पाहणी केली. या केंद्रामुळे रेल्वे स्थानक परिसरातली गर्दी कमी होऊन प्रवासही सुकर व्हायला मदत होईल असं ते म्हणाले. इथं पुरवलेल्या सुविधा आणखी ७६ रेल्वे स्थानकांवरही उपलब्ध करण्यात ये...

October 10, 2025 3:40 PM

views 43

म्हाडाच्या ५,३५४ सदनिका आणि ७७ भूखंड विक्रीसाठी उद्या संगणकीय सोडत

म्हाडाच्या कोकण विभागातून विविध गृहनिर्माण योजनेतून उभारलेल्या सदनिका तसंच काही भूखंड विक्रीसाठीची संगणकीय सोडत उद्या उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. ठाणे, वसई आणि पालघऱ जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या ५ हजार ३५४ सदनिका आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ओरोस आणि कुळगा...