पुणे महानगरपालिकेतल्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे दोन्ही पक्ष पुन्हा एकदा आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका एकत्रितपणे लढवणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी काल पुण्यात ही माहिती दिली.
शशिकांत शिंदे यांनी बारामती इथं शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर झालेल्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि इतर नेते उपस्थित होते, अशी माहिती त्यांनी दिली. महानगरपालिका निवडणुकीतील पराभवाचं आत्मचिंतन करून दोन्ही पक्ष नव्या दमानं पुढे जातील, असं ते म्हणाले.