January 17, 2026 3:12 PM

views 57

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हा परिषद निवडणुकाही एकत्रित लढवणार!

पुणे महानगरपालिकेतल्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे दोन्ही पक्ष पुन्हा एकदा आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका एकत्रितपणे लढवणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी काल पुण्यात ही माहिती दिली.   शशिकांत शिंदे यांनी बारामती इथं शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर झालेल्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि इतर नेते उपस्थित होते, अशी ...

January 12, 2026 2:51 PM

views 478

राज्यातल्या जिल्हा परिषद निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याची मुभा निवडणूक आयोगाला देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

राज्यातल्या १२ जिल्हा परिषदा आणि सव्वाशे पंचायत समित्यांची  निवडणूक प्रक्रिया १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयानं आज दिली. मतदान यंत्रांची कमतरता, प्रशासकीय अडचणी यासारखी कारणं देत राज्य निवडणूक आयोगानं ३१ जानेवारीची मुदत १० फेब्रुवारीपर्यंत वाढवून द्यावी, अशी विनंती केली होती. आरक्षण मर्यादा न ओलांडलेल्या १२ जिल्हापरिषदा आणि सव्वाशे पंचायत समित्यांची निवडणूक १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. उर्वरित २० जिल्हापरिषदांच्या निवडणुकांच्...