डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

महाराष्ट्रात महायुतीचं  सरकार आवश्यक आहे – योगी आदित्यनाथ

छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेनं आपण महाराष्ट्रात आलो असून देशाला सक्षम करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महायुतीचं सरकार आवश्यक आहे, असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज वाशिम इथं झालेल्या जाहीर सभेत सांगितलं.

 

एकजुटीनं राष्ट्रविरोधी शक्तीच्या विरोधात लढा द्या, असं आवाहन त्यांनी केलं. यावेळी वाशिम मंगरूळपीर विधानसभा मतदारसंघातले भाजपचे उमेदवार श्याम खोडे उपस्थित होते. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मूर्तिजापूर  मतदारसंघात महायुतीचे उमेदवार हरीश पिंपळे यांच्या प्रचारार्थ देखील योगी आदित्यनाथ यांनी सभा घेतली.