January 11, 2025 10:47 AM

views 30

दिल्लीत योगी आदित्यनाथ यांनी घेतली प्रधानमंत्र्यांची भेट

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. प्रधानमंत्र्यांच्या मार्गदर्शन आणि प्रेरणेमुळे प्रयागराज इथं संपन्न होत असलेला महाकुंभ मेळा शाश्वत अभिमानाचे प्रतीक ठरेल असं योगी यांनी भेटीनंतर लिहिलेल्या समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. यामधून नव्या भारताचे भव्य, दिव्य आणि डिजीटल स्वरुप दिसेल असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. प्रयागराज इथं १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी कालावधीत होतो आहे.  

November 13, 2024 6:36 PM

views 32

मविआचं अल्पसंख्यंकांचं तुष्टीकरणाचं धोरण आम्ही यशस्वी होऊ देणार नाही – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज वाशीम जिल्ह्यात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पोहरादेवी इथं सभा घेतली. महाविकास आघाडीचं अल्पसंख्यंकांचं तुष्टीकरणाचं धोरण आम्ही हे यशस्वी होऊ देणार नाही, असं ते यावेळी म्हणाले. उद्धव ठाकरे यांची साथ सोडलेले महंत सुनील महाराज राठोड यांनी यावेळी योगी यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला .

November 12, 2024 7:30 PM

views 38

भाजपच्या नवनवीन योजनांमुळे देश प्रगतीपथावर – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

भारतीय जनता पक्षाने आपल्या सत्ताकाळात नवनवीन योजना अमलात आणल्यामुळे देश प्रगतीपथावर वाटचाल करत आहे. राज्य सरकारनेही लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून त्यात भर टाकली असल्याचं प्रतिपादन भाजपा नेते, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज अकोल्यात केलं.

November 6, 2024 7:02 PM

views 27

महाराष्ट्रात महायुतीचं  सरकार आवश्यक आहे – योगी आदित्यनाथ

छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेनं आपण महाराष्ट्रात आलो असून देशाला सक्षम करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महायुतीचं सरकार आवश्यक आहे, असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज वाशिम इथं झालेल्या जाहीर सभेत सांगितलं.   एकजुटीनं राष्ट्रविरोधी शक्तीच्या विरोधात लढा द्या, असं आवाहन त्यांनी केलं. यावेळी वाशिम मंगरूळपीर विधानसभा मतदारसंघातले भाजपचे उमेदवार श्याम खोडे उपस्थित होते. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मूर्तिजापूर  मतदारसंघात महायुतीचे ...