November 13, 2024 6:36 PM | Yogi Adityanath

printer

मविआचं अल्पसंख्यंकांचं तुष्टीकरणाचं धोरण आम्ही यशस्वी होऊ देणार नाही – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज वाशीम जिल्ह्यात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पोहरादेवी इथं सभा घेतली. महाविकास आघाडीचं अल्पसंख्यंकांचं तुष्टीकरणाचं धोरण आम्ही हे यशस्वी होऊ देणार नाही, असं ते यावेळी म्हणाले. उद्धव ठाकरे यांची साथ सोडलेले महंत सुनील महाराज राठोड यांनी यावेळी योगी यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला .