डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

March 24, 2025 6:50 PM | World TB Day

printer

रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात ‘जागतिक क्षयरोग विरोधी दिन’ साजरा

रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात आज जागतिक क्षयरोग विरोधी दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपस्थित नागरिकांना क्षयरोगाबद्दल माहिती दिली. त्या व्यतिरिक्त क्षयरोगमुक्त ग्रामपंचायती म्हणून निवड झालेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंचांना प्रशस्तिपत्रकं तसंच  सन्मानचिन्ह  प्रदान करून  गौरवण्यात आलं. क्षयरोग जनजागृतीच्या उद्देशानं आयोजित रांगोळी, निबंध, चित्रकला स्पर्धांमधल्या यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिकं देण्यात आली. 

हिंगोली जिल्ह्यातही क्षयरोगमुक्त ग्रामपंचायतीना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा