डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

March 24, 2025 6:47 PM | World TB Day

printer

टीबीच्या १०,००० आयसोलेटचं जिनोम सिक्वेन्सिंग पूर्ण

केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज नवी दिल्ली इथे टीबी अर्थात मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिसच्या १०,००० आयसोलेटचं जिनोम सिक्वेन्सिंग पूर्ण झाल्याची माहिती दिली. जागतिक क्षयरोग विरोधी दिनानिमित्त सिंह यांनी ही घोषणा केली. जिनोमिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून क्षयरोगाच्या औषधांची क्षमता वाढवण्याचं या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे. २०३० पर्यंत क्षयरोगावर मात करण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचंही सिंह म्हणाले. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा