डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

मुख्यमंत्र्यांनी शासकीय निवासस्थानी केलं ‘वृक्षारोपण’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी वृक्षारोपण केलं. पर्यावरण दिनाच्या या वर्षीच्या संकल्पनेनुसर पर्यावरणाला प्लास्टिक मुक्त करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. राज्य शासनानं आजपासून ३१ ऑक्टोबर पर्यंत राष्ट्रीय प्लास्टिक प्रदूषण निर्मूलन मोहिमेचं आयोजन केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. 

 

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राज्यातही विविध कार्यक्रमांचं  आयोजित करण्यात आलं आहे.  

 

या निमित्तानं मुंबईत आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वातावरण बदलाबाबत  जनजागृती करण्यासाठी जागतिक प्रचार मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. एकदा वापरलं जाणारं प्लास्टिक पर्यावरणाचा सर्वात मोठा शत्रू असून याचा वापर थांबवणं हा पर्यावरण संवर्धनासाठीचा महत्वपूर्ण निर्णय असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. राज्य सरकारच्या १० कोटी वृक्षलागवड मोहिमेत नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी  केलं. 

 

छत्रपती संभाजी नगरमध्ये पर्यावरण जागरूकतेसाठी आयोजित केलेल्या सायकल रॅलीचं उदघाटन खासदार भागवत कराड यांनी केलं. 

 

अहिल्यानगर जिल्ह्यातल्या हिवरे बाजार इथल्या मातृस्मृती वनमंदिरात चौदाशे देशी वृक्षांच्या लागवडीच्या मोहिमेचा पर्यावरण दिनी प्रारंभ झाला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा