महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल भारताने पाकिस्तानचा 88 धावांनी पराभव केला.भारतानं दिलेल्या 247 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 159 धावांवर बाद झाला. क्रांती गौड आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. क्रांती गौड सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली. स्पर्धेत भारताचा हा दुसरा विजय असून भारतीय संघ गुणतालिकेत अव्वलस्थानी आहे. भारताचा सामना आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध येत्या 9 तारखेला विशाखापट्टणम इथं होणार आहे.
Site Admin | October 6, 2025 2:46 PM | Womens World Cup 2025
महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर विजय
