निवडणूक आयोग आज दुपारी चार वाजता नवी दिल्लीत बिहार विधानसभा निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर करणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांच्यासह वार्ताहर परिषद घेणार आहेत. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या कि आदर्श आचारसंहिता लागू होईल. २४३ सदस्यांचा समावेश असलेल्या बिहार विधानसभेचा कार्यकाळ येत्या २२ नोव्हेंबरला समाप्त होत आहे.
Site Admin | October 6, 2025 4:52 PM | ECI
बिहार विधानसभा निवडणुकीचं वेळापत्रक आज जाहीर होणार