महिला क्रिकेटमधे, एकदिवसीय तिरंगी मालिकेत आज कोलंबो इथं झालेल्या अंतिम सामन्यात Womens Tri-Nation Series आणि करंडक पटकावला.
भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला, आणि निर्धारित ५० षटकात ७ गड्यांच्या मोबदल्यात ३४२ धावा केल्या. त्यात स्मृती मंधानानं १०१ चेंडूत ११६ धावा करून मोलाचं योगदान दिलं. एकदिवसीय क्रिकेटमधलं तिचं हे अकरावं शतक होतं. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं करणारी ती तिसरी महिला क्रिकेटपटू ठरली आहे. स्मृती या सामन्यातली सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली.
विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव सामन्यातले १० चेंडू बाकी असतानाच २४५ धावांवर आटोपला.
भारतातर्फे स्नेह राणानं ४, तर अमनज्योत कौरनं ३ बळी मिळवले. या मालिकेत एकूण १५ बळी मिळवत स्नेह राणा मालिकेतली सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली.