January 5, 2026 1:22 PM | sir | West Bengal

printer

पश्चिम बंगालमध्ये मतदार यादी निरीक्षकावर हल्ला, निवडणूक आयोगाची कारवाई अहवालाची मागणी

पश्चिम बंगालमध्ये मतदार यादी सखोल पुनरीक्षण शिबिरांना भेट देताना मतदार यादी निरीक्षकावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाने कारवाई अहवालाची मागणी केली आहे. दक्षिण २४ परगणा जिल्ह्यात मतदार यादी पुनरीक्षण शिबिरांना भेट देतेवेळी मतदार यादी निरीक्षक सी. मुरुगन यांच्यावर जमावाने हल्ला केला. निवडणूक आयोगाने या प्रकरणासंदर्भातल्या कारवाईचा अहवाल उद्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत राज्याचे पोलीस महासंचालक राजीव कुमार यांनी सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसंच, यापुढे अशा प्रकारच्या भेटीवेळी सुरक्षेची संपूर्ण व्यवस्था ठेवावी तसंच, एक वरिष्ठ पोलीस अधिकारीही नियुक्त करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.