पश्चिम बंगालमध्ये SIR दरम्यान २००२ च्या मतदार यादीत त्रुटी

पश्चिम बंगालमध्ये विशेष सखोल पुनरिक्षण अर्थात एसआयआर प्रक्रियेदरम्यान आई-वडील, नातेवाईकांच्या नावांच्या आधारे मतदारांची ओळख पटवताना २००२ च्या मतदार यादीत अनेक त्रुटी आढळून आल्या. विशेष सखोल पुनरिक्षणाचा पहिला टप्पा संपला असला तरी निवडणूक आयोग सातत्यानं याद्यांची पडताळणी करत आहे. 

 

८५ लाख १ हजार ४८६ मतदारांच्या वडिलांचे नाव चुकीचे असल्याचे आढळले. हे प्रमाण एकूण मतदारांच्या ११ पूर्णांक ९ दशांश टक्के आहे. आई-वडिल आणि मुलांच्या वयातल्या अंतरात मोठी तफावत आढळून येण्याचं प्रमाणही खूप आहे. वय ४५ वर्षांहून अधिक असूनही नवे मतदार अशी नोंद केलेल्या मतदारांची संख्या २० लाख ७४ हजार २५६ आहे. तर १३ लाख ४६ हजार ९१८ मतदारांच्या लिंगविषयक माहितीत त्रुटी आहेत. 

 

या मतदारांचे अर्जांचे डिजिटल स्वरुपात आहेत, मात्र त्यांना सुनावणीसाठी बोलावण्यात येणार असल्याचं आयोगातल्या सूत्रांनी सांगितलं. जलद सत्यपडताळणी आणि सुधारणेसाठी ही माहिती प्रत्येक जिल्हा निवडणूक अधिकारी आणि ब्लॉक स्तरावरच्या कर्मचाऱ्यांकडे पाठवण्यात आली आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.