डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

पश्चिम बंगालमधे भूस्खलनाच्या घटनांमधे २३ जणांचा मृत्यू

पश्चिम बंगालमधे मुसळधार पाऊस होत असून भूस्खलनाच्या घटनांमधे आतापर्यंत २३ जणांचा मृत्यू  झाला आहे. तिस्ता नदीला पूर आला आहे, राष्ट्रीय महामार्गांवर पाणी साचलं आहे. शेतात आणि घरात पाणी शिरलं आहे. एनडीआरएफची पथकं आपद्ग्रस्त भागात मदतकार्य करत आहेत. 

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या आपत्तीत झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केलं आहे, तसंच बचाव आणि मदतकार्य जलद व्हावं यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. ममता बॅनर्जी उद्या सर्वाधिक जीवितहानी झालेल्या मिरिक भागाचा दौरा करणार आहेत. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.