October 7, 2024 8:13 PM | West Bengal

printer

पश्चिम बंगाल : कोळसा खाणीत झालेल्या स्फोटात ७ जणांचा मृत्यू

पश्चिम बंगालमधल्या बिरभूम जिल्ह्यात कोळसा खाणीत झालेल्या स्फोटात सात जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. भदुलिया खाणीत स्फोट करण्याची तयारी सुरू असतानाच हा अपघात झाला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.