डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

देशाच्या विविध भागात जोरदार पावसाची शक्यता

गुजरात, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, सौराष्ट्र, कच्छ, तामिळनाडू, पुद्दुचेरी, उत्तराखंड आणि पश्चिम राजस्थानमध्ये आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

 

पुढील २ ते ३ दिवसांत दिल्ली, महाराष्ट्र, ओडिशा, पंजाब, तामिळनाडू, पुद्दुचेरी, तेलंगणा, विदर्भ, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. तर पूर्व मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र आणि उत्तराखंडमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. येत्या २ दिवसांत राजस्थानमध्ये धुळीचं वादळ येण्याची शक्यता विभागानं वर्तवली आहे.

 

हवामान विभागानं येत्या चार दिवसांत राज्याच्या अनेक भागात अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा अंदाज वर्तवला आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडसह आसपासच्या जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे तसचं ३० ते ४० किमी प्रती तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. 

 

परभणी, जळगाव, जालना यांसह विदर्भ आणि मराठवाड्याच्या अनेक भागांत तीव्र वाऱ्यासह पाऊस झाला आणि गारा पडल्या. त्यामुळे पिकांचं नुकसान झालं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.