डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

जुलै महिन्यात संपूर्ण देशभरात पावसाचं प्रमाण मासिक सरासरीपेक्षा जास्त असेल- IMD

जुलै महिन्यात संपूर्ण देशभरात पावसाचं प्रमाण मासिक सरासरीपेक्षा जास्त असेल आणि दीर्घकालीन सरासरीच्या १०६ टक्क्यांहून जास्त असेल असा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे. 

 

देशातील बहुतेक भागात सामान्य ते मध्यम प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. परंतु ईशान्य आणि पूर्वेकडील बहुतेक भाग, दक्षिणेकडील द्वीपकल्पीय भाग आणि वायव्य भारतातील काही भागात या वर्षी जुलै महिन्यात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे अशी माहिती IMD चे महासंचालक मृत्युंजय मोहापात्रा यांनी काल दूरस्थ पद्धतीनं आयोजित  पत्रकार परिषदेत दिली.

 

दरम्यान उत्तराखंड मध्ये गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं थोडी विश्रांती घेतली असल्यानं विविध भागातील रस्ते जलद गतीनं स्वच्छ् करण्याचं काम सुरू आहे आणि रस्त्यांची दुरुस्ती वेगानं सुरू आहे. भूस्खलनामुळे राज्यातील शंभराहून अधिक ग्रामीण जोड रस्ते अजूनही बंद आहेत.

 

हवामान खात्याने पुढील दोन दिवसांत उत्तरकाशी, देहरादून, टिहरी, पौडी, रुद्रप्रयाग, नैनिताल आणि बागेश्वर जिल्ह्यांच्या काही भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. 

 

हिमाचल प्रदेशात ढगफुटी, भूस्खलन आणि मुसळधार पावसामुळे अनेक भागात दैनंदिन जीवन विस्कळीत झालं आहे. शिमला येथील हवामान केंद्रानं ६ जुलैपर्यंत येथील बहुतेक भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा