पश्चिम किनारपट्टीत मुसळधार पावसाचा इशारा

देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर आज जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि गुजरातमध्ये पुढील दोन दिवस जोरदार वारे आणि पाऊस पडेल. वायव्येकडची राज्यं आणि दिल्लीत काल तापमान कमी झालं. मान्सून अद्याप पुढे सरकला  नसला तरी कोकण, गोवा आणि कर्नाटकच्या किनारीभागात जोरदार पाऊस पडत आहे.अशी माहिती हवामान विभागाचे ज्येष्ठ वैज्ञानिक आर के ज्ञानमणी यांनी आकाशवाणीला दिली.