देशाच्या विविध भागात मुसळधार पावसाचा इशारा

सौराष्ट्र, कच्छ, पश्चिम बंगाल, ओदिशा, बिहार, झारखंड आणि देशाच्या अन्य भागात उद्यापर्यंत जोरदार ते अती जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तर  बिहार, झारखंड, मध्यप्रदेश आणि राजस्थानच्या काही भागात आज विजांच्या लखलखाटासह वादळी वारे वाहतील असा अंदाज आहे. 

 

येत्या शुक्रवारपर्यंत दिल्लीसह हरियाणा, पंजाब, आणि उत्तरप्रदेशात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.