मुंबईत वेव्हज् परिषदे दरम्यान वेव्हज् बाजाराचही आयोजन

मुंबईत होणाऱ्या वेव्हज् परिषदेच्या दरम्यान वेव्हज् बाजारचंही आयोजन केलं जाणार आहे. यात चित्रपट, टीव्ही, ॲनिमेशन, व्हीएफएक्स, गेमिंग आणि कॉमिक्स यासारख्या क्षेत्रातले दिग्गज एकत्र येणार आहेत. यात भागीदारी, व्यवसाय विस्तार यासारख्या गोष्टींवर चर्चा होईल. त्यासाठी प्रक्षेपण व्यवस्था, खरेदीदार – विक्रेते यांच्यातल्या बैठकांकरता जागा, आंतर-देशीय भागीदारी यासाठी सुविधा उपलब्ध असेल. www.wavesbazaar.com या संकेतस्थळावर याविषयी अधिक माहिती उपलब्ध आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.