वेव्हजच्या माध्यमातून देशात गुंतवणुकीसाठी जगभरातले गुंतवणूकदार भारतात येणार

वेव्हज परिषदेच्या माध्यमातून देशात गुंतवणुकीसाठी जगभरातले गुंतवणूकदार भारतात येणार असल्याचं माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. नवी दिल्लीत ते वार्ताहरांशी बोलत होते. डिजिटल इंडियामुळं अनेक तंत्रज्ञान सुलभतेनं देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं आहे. त्यामुळं देशात मोठ्या प्रमाणात डिजिटल कंटेटची निर्मिती होत असल्याचं ते म्हणाले. १ ते ४ मे दरम्यान मुंबईत ही परिषद होणार आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.