January 21, 2026 12:33 PM

views 34

अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रात AI चा प्रसार करण्याचा भारताचा प्रयत्न – मंत्री अश्विनी वैष्णव

देशाच्या अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रात भारत कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रसार करण्याचा प्रयत्न करत आहे, असं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे . ते दावोस इथं जागतिक आर्थिक मंचाच्या नो रेफरी या सत्रात बोलत होते. ग्राफीक प्रोसेसिंग युनिटची उपलब्धता असणं एआयच्या प्रसारासाठी आवश्यक आहे. सार्वजनिक खासगी भागीदारीद्वारे सरकार ही गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं वैष्णव म्हणाले. आतापर्यंत ३८ हजार जीपीयू पॅनलमधे समाविष्ट केल्याचं त्यांनी सांगितलं. ...

December 13, 2025 9:03 PM

views 22

वंदे भारत गाड्यांमध्ये स्थानिक खाद्यपदार्थ देण्यात यावे अशा रेल्वेमंत्र्यांच्या सूचना

वंदे भारत गाड्यांमध्ये स्थानिक खाद्यपदार्थ देण्यात यावे अशा सूचना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज दिल्या. IRCTC च्या वेबसाइटवर खाती उघडण्यासाठी कठोर पडताळणी सुरू केल्यापासून नव्या खात्यांची संख्या दैनंदिन १ लाखावरुन ५ हजारापर्यंत कमी झाल्याचं ते म्हणाले. ३ कोटींपेक्षा अधिक बनावट खाती बंद केली असून २ कोटींहून अधिक युझर आयडी निलंबित केल्याचं ते म्हणाले. तिकिट यंत्रणा प्रवाशांकरता सोपी आणि सुलभ असावी, असे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

October 2, 2025 10:58 AM

views 36

मंत्री अश्विनी वैष्णव आज राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था डिजीटल विद्यापीठ मंचाचे उद्घाटन कऱणार

केंद्रिय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव आज दिल्लीत राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था डिजीटल विद्यापीठ मंचाचे उद्घाटन कऱणार आहेत. उच्च गुणवत्ता डिजीटल शिक्षणाच्या उपलब्धतेचे लोकशाहीकरण कऱण्यासाठी या मंचाची निर्मिती केली आहे. यावेळी वैष्णव यांच्या हस्ते पाच नव्या केंद्रांचे दूरस्थ प्रणालीद्वारे उद्घाटन देखील होणार आहे.

September 18, 2025 8:12 PM

views 32

डिजिटल व्यक्तिगत डेटा संरक्षण नियमांचं काम अंतिम टप्प्यात – मंत्री अश्विनी वैष्णव

डिजिटल व्यक्तिगत डेटा संरक्षण नियमांचं काम अंतिम टप्प्यात आलं असून येत्या काही दिवसांतच ते प्रसिद्ध केले जातील, अशी माहिती केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज दिली. एआय इम्पॅक्ट समिट २०२६चं बोधचिन्ह आणि महत्त्वाच्या उपकरणांच्या प्रकाशनाच्या वेळी ते बोलत होते. पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात ही परिषद होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.   देशात एआय मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असून विविध क्षेत्रांमध्ये एआय सुविधा पोहोचायला याद्वारे मदत होत असल्याचं त्यांनी ...

September 6, 2025 8:15 PM

views 39

जीएसटी दरकपातीनं जीडीपीत २० लाख कोटी रुपयांची भर पडेल-अश्विनी वैष्णव

जीएसटी सुधारणेमुळे देशाच्या जीडीपीत २० लाख कोटी रुपयांची भर पडणार असून यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल, असा विश्वास माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना व्यक्त केला. हा मध्यमवर्गासाठी मोठा दिलासा असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं.   गेल्या अकरा वर्षांत इलेक्ट्रॉनिक उत्पादनात ६ पट वाढ झाली असून इलेक्ट्रॉनिक क्षेत्र हे देशातलं अव्वल दर्जाचं क्षेत्र म्हणून उदयाला येत असल्याचं अश्विनी वैष्णव यावेळी म्हणाले. गेल्या दशकभरात इलेक्ट्रॉनि...

July 18, 2025 2:09 PM

views 36

‘सर्जनशील अर्थव्यवस्थेत कामासाठी धडपडणाऱ्यांना साधनसामुग्री आणि प्रशिक्षण देण्यासाठी सरकार वचनबद्ध’

मुंबई शहर चित्रपट आणि सर्जनशीलतेची राजधानी असून सर्जनशील अर्थव्यवस्थेत कामासाठी धडपडणाऱ्यांना साधनसामुग्री आणि प्रशिक्षण देण्यासाठी आपलं सरकार वचनबद्ध असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. मुंबईच्या राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ कार्यालयाच्या परिसरात आज इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. केंद्र सरकारने मे महिन्यात आयोजित केलेल्या वेव्हज उपक्रमाचा कार्य अहवालही यावेळी प्रकाशित करण्यात आला.    देशाच्या भविष्यासाठी विशे...

April 19, 2025 8:17 PM

views 39

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी देशभरातल्या प्रसार माध्यमांतल्या वरिष्ठांशी संवाद साधला

माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वेव्हजच्या निमित्तानं देशभरातल्या प्रसार माध्यमांतल्या वरिष्ठांशी संवाद साधला. बदलत्या तंत्रज्ञानानुसार नवनवीन गोष्टी आपल्यासमोर येत आहेत. या नव्या गोष्टींसाठी तयार राहण्याकरता एकत्रित प्रयत्न करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. चांगल्या दर्जाच्या कलाकृतीची निर्मिती आता देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून होऊ शकते आणि त्याला प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. वेव्हज परिषदेसाठी १ लाखांहून अधिक जणांनी नोंदणी केली आह...

April 8, 2025 8:21 PM

views 32

इलेक्ट्रॉनिक्स काँपोनंट उत्पादन योजनेची अधिसूचना काढण्यात येईल-अश्विनी वैष्णव

इलेक्ट्रॉनिक्स काँपोनंट उत्पादन योजनेची अधिसूचना आज काढण्यात येईल असं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. अधिसूचना जाहीर झाल्यावर योजनेच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक तत्वं तयार करण्यासाठी उद्योजकांशी चर्चा केली जाईल, असं त्यांनी सांगितलं. तसंच या योजने अंतर्गत अर्ज स्वीकारायला काही दिवसातच सुरुवात होईल असंही त्यांनी सांगितलं.   इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच इलेक्ट्रॉनिक्स काँपोनंट उत्पादन योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेकरता २...

April 7, 2025 8:36 PM

views 28

वेव्हजच्या माध्यमातून देशात गुंतवणुकीसाठी जगभरातले गुंतवणूकदार भारतात येणार

वेव्हज परिषदेच्या माध्यमातून देशात गुंतवणुकीसाठी जगभरातले गुंतवणूकदार भारतात येणार असल्याचं माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. नवी दिल्लीत ते वार्ताहरांशी बोलत होते. डिजिटल इंडियामुळं अनेक तंत्रज्ञान सुलभतेनं देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं आहे. त्यामुळं देशात मोठ्या प्रमाणात डिजिटल कंटेटची निर्मिती होत असल्याचं ते म्हणाले. १ ते ४ मे दरम्यान मुंबईत ही परिषद होणार आहे.

March 22, 2025 5:08 PM

views 38

खासदार श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांनी घेतली रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट

कल्याण लोकसभा खासदार श्रीकांत शिंदे आणि ठाणे लोकसभा खासदार नरेश म्हस्के यांनी आज नवी दिल्ली इथं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली आणि मुंबई उपनगरी रेल्वे प्रवाशांच्या विविध मागण्यांबाबतचं निवेदन सादर केलं. उपनगरी रेल्वे प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा, प्रवाशांना अधिक चांगल्या सोयी सुविधा मिळाव्यात, सेवांचा दर्जा सुधारावा, या आणि इतर मागण्यांचा यात समावेश आहे.    महिलांसाठी विशेष लोकल सेवा, स्वच्छ प्रसाधनगृहं, कमी गर्दीच्या वेळी महिलांच्या डब्यात सुरक्षा रक्षक तैनात करावेत, अपघा...