देशातील शालेय स्तरावरील ‘विकसित भारत बिल्डथॉन 2025’ ही हॅकेथॉन स्पर्धा, आज सकाळी 10 ते रात्री 11 वाजेपर्यंत होणार आहे. देशभरातल्या शाळांमधील इयत्ता 6 वी ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना त्यांची सर्जनशीलता आणि समस्या सोडवण्याचे कौशल्य दाखवण्यासाठी सक्षम बनवणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
यावर्षीची स्पर्धा, आत्मनिर्भर भारत, स्वदेशी, व्होकल फॉर लोकल आणि समृद्ध भारत या चार संकल्पनांवर आधारित आहे. या स्पर्धेतील, राष्ट्रीय स्तरावरील 10, राज्यस्तरावरील 100 आणि जिल्हास्तरावरील 1 हजार विजेत्यांना एकंदर 1 कोटी रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत.