बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठीची अधिसूचना आज जारी झाली. या टप्प्यात, 20 जिल्ह्यांमधल्या 122 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला पाररंभ झाला असून त्याची मुदत 20 ऑक्टोबर पर्यंत आहे. 21 ऑक्टोबरला अर्जांची छाननी होईल, तर 23 ऑक्टोबर पर्यंत उमेदवारी मागे घेता येईल.. या टप्प्यासाठी 11 नोव्हेंबरला मतदान होणार आहे.
Site Admin | October 13, 2025 3:26 PM | Bihar Election 2025
बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठीची अधिसूचना जारी