December 30, 2025 8:11 PM | Viksit Bharat

printer

भारताची सांस्कृतिक क्षेत्रातली वाटचाल

२०२५ हे वर्ष भारतासाठी सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचं ठरलं. जगभरात भारताची वेगळी सांस्कृतिक ओळख निर्माण करण्यात यावर्षी देशाला यश आलं आहे. भारताच्या या वर्षातल्या सांस्कृतिक क्षेत्रातल्या वाटचालीविषयी…

 

मराठा सैन्यदलाचा इतिहास सांगणाऱ्या १२ किल्ल्यांचा समावेश या वर्षी युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत झाला, तसंच दिवाळी या सणानं युनेस्कोच्या अद्वितीय वारशाच्या यादीत स्थान मिळवलं. भारताच्या हस्तलिखितांचं जतन, डिजिटायजेशन आणि प्रसार करण्यासाठी ग्यान भारतम या उपक्रमाची सुरुवात यंदा झाली. लोकमाता अहिल्याबाई होळकर यांची तीनशेवी जयंती भोपाळमध्ये उत्साहाने साजरी करण्यात आली, तसंच देशभरात यानिमित्त विविध कार्यक्रम झाले.

 

भारताची आदिवासी आणि लोकपरंपरा अधोरेखित करणाऱ्या, यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सादर झालेल्या आणि ५ हजार कलाकारांचा सहभाग असलेल्या ‘जयती जय मम भारतम’ या कार्यक्रमाची नोंद गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली. सरदार वल्लभभाई पटेल यांची दीडशेवी जयंती एकता दिवस म्हणून साजरी करण्यात आली आणि यानिमित्त विशेष नाणं आणि टपाल तिकिटाच्या अनावरणासह देशभरात विविध कार्यक्रम घेण्यात आले. तसंच, डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या १२५व्या जयंती वर्षाची सुरुवातही यंदा झाली. याशिवाय, विठ्ठलभाई पटेल स्वातंत्र्यपूर्व भारताच्या लोकसभेचे पहिले सभापती झाल्याच्या घटनेला १०० वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्तानं यंदा राष्ट्रीय सभापती परिषद झाली.