डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

सरकारी जमिनींवरच्या अतिक्रमणाला जबाबदार असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार

राज्यातल्या सरकारी जमिनींवर अतिक्रमण करून अनधिकृत बांधकाम करण्यासाठी जबाबदार असणाऱ्या महसूल विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विचार सुरू आहे अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत दिली. 

 

राज्यातील वन विभागाच्या बाहेर असणाऱ्या बफर झोनमधल्या शेतजमिनी वार्षिक भाड्याने घेऊन त्यावर सौर ऊर्जा प्रकल्प अथवा सुगंधी गवत लावलं जाईल, अशी माहिती वन मंत्री गणेश नाईक यांनी दिली. जंगली प्राण्यांच्या भीतीमुळे याठिकाणी शेती होत नसल्याचा मुद्दा सुलभा खोडके यांनी उपस्थित केला होता. वन विकास महामंडळाकडून वार्षिक पन्नास हजार रुपये भाड्याने घेऊन त्यावर हे प्रकल्प राबविण्यात येतील, महसूल आणि वन विभागाने एकत्रितरित्या हा निर्णय घेतल्याचं वनमंत्री म्हणाले. 

 

एमपीएससीनं घेतलेल्या लिपिक आणि टंकलेखक परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे. या परीक्षेच्या संदर्भात काही विद्यार्थ्यांनी मॅटमध्ये याचिका दाखल केली होती. मॅटनं तोंडी निकाल दिला आहे. त्यांचा निकाल अधिकृतरित्या जाहीर झाल्यावर यशस्वी विद्यार्थ्यांची यादी जाहीर करू, अशी माहिती मंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या दरम्यान दिली. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिभासेतू नावाचा नवा प्रकल्प राबवण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा