July 11, 2025 4:05 PM

views 33

सरकारी जमिनींवरच्या अतिक्रमणाला जबाबदार असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार

राज्यातल्या सरकारी जमिनींवर अतिक्रमण करून अनधिकृत बांधकाम करण्यासाठी जबाबदार असणाऱ्या महसूल विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विचार सुरू आहे अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत दिली.    राज्यातील वन विभागाच्या बाहेर असणाऱ्या बफर झोनमधल्या शेतजमिनी वार्षिक भाड्याने घेऊन त्यावर सौर ऊर्जा प्रकल्प अथवा सुगंधी गवत लावलं जाईल, अशी माहिती वन मंत्री गणेश नाईक यांनी दिली. जंगली प्राण्यांच्या भीतीमुळे याठिकाणी शेती होत नसल्याचा मुद्दा सुलभा खोडके यांनी उपस्...

March 18, 2025 7:29 PM

views 48

राज्य सांस्कृतिक केंद्र आणि वस्तुसंग्रहालय मुंबईत उभे करण्यात येणार

राज्य सांस्कृतिक केंद्र आणि राज्य वस्तुसंग्रहालय मुंबईत उभे करण्यात येणार आहे, असं सांस्कृतिक कार्य मंत्री ऍडव्होकेट आशिष शेलार यांनी आज विधानसभेत जाहीर केलं. राज्याच्या राजधानीत वांद्रे- कुर्ला संकुलात उभारलेल्या या वास्तूमुळे सांस्कृतिक देवाणघेवाण साध्य होईल, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कलाकारांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.