डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

विदर्भात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती, बचावकार्य सुरू

विदर्भात बहुतांश जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचून अनेक रस्ते बंद झाले आहेत तसंच नद्या आणि नाले दुथडी भरुन वाहत आहेत. वर्धा इथं यशोदा नदीला पूर आल्यानं वर्धा ते राळेगाव रस्ता बंद झाला आहे. नागपूर महानगरपालिका आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापनानं बचाव कार्य सुरू केलं आहे. नागपूर रेल्वे स्थानकात पाणी भरलं असल्यानं रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेला आहे. नरेंद्र नगर रेल्वेच्या पुलावर पाणी आल्यानं पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे. शहरात अनेक भागात पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसून पावसाचं पाणी घरात शिरत असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिक करत आहे. कळमेश्वर तालुक्यात अतिवृष्टीमुळे एकाचा मृत्यू झाला आहे.

 

हवामान विभागानं नागपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांना हा रेड अलर्ट दिला आहे. या जिल्ह्यांमध्ये वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर अमरावती, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये ऑरेंज अलर्ट आहे. याठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. 

 

विदर्भात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून शासनाने बचाव आणि मदतकार्य सुरू केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. याबाबतचा प्रश्न सदस्य नाना पटोले यांनी उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.